सममित आणि असममित संघराज्यवाद: भारत व अमेरिका या संघराज्यांतील वरिष्ठ सभागृहातील प्रतिनिधित्वाचे राज्यनिहाय विश्लेषण
Creators
- 1. संशोधक (JRF), राज्यशास्त्र विभाग, डॉ. रफिक झकारिया महाविद्यालय, छ. संभाजीनगर.
Description
सारांश:
‘सममितता’ आणि ‘असमितता’ या मुलत: गणित विषयातील संकल्पना होत. या संकल्पनांचा राज्यशास्त्रामध्ये अवलंब करण्यात आल्याने संघराज्यवादाचा अर्थ अधिक स्पष्टतः उलगडणे शक्य झाले. भारतीय संघराज्यामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये सर्व घटकराज्यांना अमेरिकी सिनेटप्रमाणे सम-समान प्रतिनिधित्व प्रदान करण्यात आलेले नाही. भारतामध्ये राज्यसभ्येमध्ये घटकराज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. परिणामी आल्फ्रेड स्टेपनने अमेरिकी संघराज्य प्रारूपास ‘सममित’ संबोधले आहे. याऊलट त्याने भारतीय संघराज्याचे वर्गीकरण ‘असममित’ प्रकारामध्ये केले आहे.
संघराज्याच्या भिन्न प्रारूपांचा अवलंब करण्यात आल्याने प्रस्तुत संघराज्यांमध्ये केंद्र व घटकराज्य संबंध तसेच घटकराज्यांतील परस्परांमधील संबंध भिन्नतः प्रभावित झाले आहेत. भारतीय संघराज्यामधील घटकराज्यांना लाभलेल्या असमान स्वायत्ततेमुळे केंद्र सरकार अधिक प्रबळ बनले आहे. अमेरिका संघराज्यातील (यु. एस. ए.) घटकराज्यांना सिनेटमध्ये तसेच वित्तीय आणि प्रशासकीय बाबतीत तुलनेने समान स्वायत्तता व अधिकार प्राप्त झाले आहेत. परिणामी, तेथे घटकराज्ये अधिक स्वायत्त व प्रबळ बनली आहेत.
Files
100653.pdf
Files
(446.8 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:41fe8d0b1bef17f9ebf0a2e27025a629
|
446.8 kB | Preview Download |