Published June 30, 2023 | Version v1
Journal article Open

कोरकू मराठी भाषिक शब्दकोशाचा आदिवासी विदयार्थ्यांच्या शालेय संपादनावर होणारा परिणाम एक अभ्यास

  • 1. 1संशोधक विद्यार्थी कला वाणिज्य महाविद्यालय येवदा संत गाडगे बाबा अमरावती विदयापीठ अमरावती
  • 2. 2 प्राचार्य कला वाणिज्य महाविद्यालय येवदा संत गाडगे बाबा अमरावती विदयापीठ अमरावती

Description

आदिवासी भागात शाळा असल्यामुळे पूर्ण वेळ शाळेत राहणा-या मुलांचे प्रमाण आज कमालीचे घसरले आहे. इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील विद्यार्थी संख्या अतिशय कमी झाल्याचे आपणास पाहावयास मिळते. विशेष जाणवणारी बाब म्हणजे शाळेतील शिक्षण आणि शाळेबाहेरील मुलांचे नित्य जीवन यात सुसंवाद राहिलेला नाही. त्यामुळे मुले शाळेला कंटाळतात. शाळा सोडून गावात, जंगलात भटकणे पसंत करतात. शाळेचा कंटाळा, न्यूनगंड, उदासीनता यांनी पछाडलेली असतात. शाळेत त्यामुळे गळतीचे प्रमाण मोठे आहे. पालकांची आर्थिक परिस्थिती, अज्ञान, उदासीनता यांसारख्या गोष्टींची नित्याची अडचण असते. पाठ्यपुस्तकातील अभ्यासात आदिवासी मुलांना गोडी वाटत नाही. त्यांच्या अवतीभोवतीच्या समाजाचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात त्याना दिसत नाही. मुलांच्या सामाजिक आणि मानसिक गरजा ही पाठ्यपुस्तके व सध्याचा अभ्यासक्रम पुरवू शकत नाही. जीवन आणि शिक्षण यांचा ताळमेळ कुठे लागत नाही. त्यांच्यात कधी सुसंवाद होत नाही. आदिवासींच्या बोली भाषांचाही प्रश्न आहे. ७४ बोली भाषा आहेत. परंतु प्रमाण भाषा आणि  बोलीभाषा यांच्यात कुठे ताळमेळ बसत नाही. भाषा हे संस्कृती संवर्धनाचे मोठे माध्यम आहे. आदिवासी बोली भाषा ही त्यांची ख-या अर्थाने अस्मिता आहे.

Files

41.pdf

Files (354.3 kB)

Name Size Download all
md5:38dca075e263a296ca5389094674dc6a
354.3 kB Preview Download