साहित्याच्या अभ्यासाची अंतरविद्याशाखीय प्रस्तूतता'
Description
प्रस्तूत शोध निबंधांत साहित्याची अंतरविद्याशाखीयता या अनुषंगाने शोध अभ्यास मांडलेला आहे. साहित्याचा अभ्यास हा विविध ज्ञानशाखांशी निगडीत असलेला अभ्यास असतो. भारतीय विद्यापीठांमधून केले जाणारे साहित्याचे अभ्यास हे प्रामुख्याने एककली अशाच प्रकारचे असलेले दिसतात. साहित्याचा अभ्यास म्हणजे साहित्याची निर्मिती प्रक्रिया, साहित्याचे आस्वादन, आकलन आणि समीक्षण याच सुत्राभोवती साहित्याचे पारंपरिक अभ्यास घुटमळलेले दिसून येतात. विद्यपीठीय संशोधनेही याच प्रकारे जास्त झालेली दिसतात.तौलनिक साहित्याच्या अभ्यासातही तुलना ही अंतरविद्याशाखीय पातळीवर होताना फारसी दिसत नाही. तौलनिक साहित्यभ्यासात तुलना ही दोन घटकावर आधारलेली असते. साहित्यातील दोन भाषिक कलाकृतीची तुलना ही प्रामुख्याने विविध स्तरावर केली जाते. एका अर्थाने तौलनिक अभ्यास हा अंतरविद्याशाखीय अभ्यासाकडे जाणारा मार्ग आहे. पण या अभ्यासाकडे तौलनिक पातळीवरच पाहिल्या जाते. तौलनिक अभ्यासक हा अंतरविद्याशाखीय दृष्टिकोण असलेला असेल तरच तुलना ही विविध पातळ्यांवर होऊ शकते. तेनने या संदर्भात जो त्रिमीती सिद्धांत मांडला आहे त्यात त्याने काळ, वंश आणि परिवेश या तीन घटकांना तुलनेत महत्वाचे मानले आहे. साहित्य हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रतिक असते त्यामुळे साहित्याचा अभ्यास हा विविधांगी दृष्टिकोनातून करता येतो. यालाच साहित्याच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे मूलभूत सूत्र म्हणता येईल. आपणाकडे साहित्याच्या अभ्यासाकडे आणि एकंदरीत विद्यापीठीय ज्ञानशाखांकडे हे विशिष्ट विषय अथवा शाखा म्हणून पहिल्या जाते. आजही आपल्या विद्यापीठांमध्ये प्रत्येक विषयाचे स्वतंत्र विभाग आहेत. देशातील मोजक्याच विद्यापीठामध्ये ‘स्कूल’ ही संकल्पना रुजत आहे. या संकल्पनेत आंतरविद्याशाखीय अभ्यासाची सुरुवात दडलेली आहे. अनेक विषयांना एकत्र घेऊन केले जाणारे अभ्यास आंतरविद्याशाखीय संकल्पनेत येतात. या अभ्यासाच्या पद्धतीत विषयांचे सहसंबंध तपासून त्यातून नवीन दृष्टिकोण विकसित केला जातो.
Files
34..pdf
Files
(366.2 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:3befa7b00c6a89d98c63c3fc4870da49
|
366.2 kB | Preview Download |