कौशल्य विकासासाठी ग्रामीण महाविद्यालयातील संधी आणि आव्हाने
Description
शिक्षण म्हणजे माणूस घडवणारी व्यवस्था. शिक्षण हे व्यक्ती, देश काल परत्वे बदलत आलेले दिसते. काळाबरोबर बदलणाऱ्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये तज्ञ समितीच्या स्थापनेतून वेळोवेळी बदल झालेले आहेत. एकविसाव्या शतकात भारत हा सर्वात जास्त युवकांची संख्या असलेला देश आहे. त्यांना शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी पुरविण्याच्या क्षमतेवर आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यानुसार शाश्वत विकास २०३० च्या कृती कार्यक्रमातील उद्दिष्ट ४ मध्ये ‘जागतिक शिक्षण विकास कृती कार्यक्रम’ समाविष्ट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची निर्मिती झाली आहे. लवचीक, कल्पक व बहुशाखीय शिक्षणक्रमाच्या सहाय्याने भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनविन्याच्या दूरदृष्टीने हे धोरण तयार झाले आहे. विकसनशील भारत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल जगातील सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्था पैकी एक होत असताना कला, मानव्यशास्त्र, व्यावसायिक शिक्षण यांचे महत्त्व अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येचे मनुष्यबळात रूपांतर करण्यासाठी शाळा-महाविद्यालयात व्यवसाय शिक्षणावर भर देणे अधिक गरजेचे आहे. परंतु भारतासारख्या कृषिप्रधान खेड्यांच्या देशात ग्रामीण भागातील महाविद्यालयांना याद्वारे कोणत्या संधी व आव्हाने निर्माण झाली आहेत याचा अभ्यास प्रस्तुत शोधनिबंधात केला आहे. परंपरागत शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण प्रवाहातून बाहेर पडलेले विद्यार्थी मोलमजुरीची कामे करतात किंवा एखाद्या व्यावसायिका सोबत मदतनीस म्हणून काम करत असतानाच त्या कामात कुशल बनतात. परंतु त्यांनी मिळवलेले हे कौशल्य अनौपचारिकरित्या मिळवल्यामुळे त्यांना त्यांच्या कौशल्याचा परतावा पाडून घ्यावा लागत होता. परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये मिळवता येण्याची सोय, तसेच कल्पक आणि लवचिक, बहुशाखीय अभ्यासक्रम रचना, प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे अनेक मार्ग यामुळे मुख्यशिक्षण प्रवाहात राहता येणे शक्य झाल्याने ग्रामीण भागातील महाविद्यालयामध्ये गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शिक्षणाद्वारे कौशल्य विकास केल्याने तरुणांच्या मनात आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबाबत आपुलकी व अभिमान वाढीस लागण्यास मदत होईल. अर्थातच धोरणाची अंमलबजावणी राज्य व केंद्र शासन यांच्या समन्वयातून व्यवस्थित होणे आवश्यक आहे.
Files
20.pdf
Files
(519.2 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:cf453cb29b8c7678d6b0875f1c24720d
|
519.2 kB | Preview Download |