Published February 28, 2023 | Version v1
Journal article Open

संत एकनाथांचा धर्म भक्ती संयोग

  • 1. मराठी विभाग, महिलारत्न पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव

Description

मराठी वांगमयाचा इतिहासाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की संत साहित्य हा मराठी वांगमय इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे इतकेच नव्हे तर एकूणच मराठी वांगमयाचा प्रवाहात मध्ययुगीन  वांग्मय  इसवीसन1050  ते इसवी सन1820  हा कालखंड मानला जातो. या काळात मोठी संत परंपरा निर्माण झालेली दिसते. भक्तीचा मळा फुलविणारा, वेदप्रामाण्य परंपरा जतन करणारा, सांस्कृतिकचे संवर्धन करून भेदाभेद विसर वयास लावणारा  वारकरी संप्रदाय व ज्ञानेश्वरांनी चैतन्यमय बनविला त्यानंतर अनेक संतांनी ही परंपरा जोपासण्याचे कार्य सुरू ठेवले. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यांचे वर्णन करताना ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस संत बहिणाबाई यांच्या वचनाची यथार्थता जाणवते. या संप्रदायाचे प्रवर्तन कधी झाले कोणी केले या इतिहासापेक्षा या संप्रदायाला चिरस्थायीत्व कोणी दिले तत्त्वज्ञानाचा आणि आचारसंहितेचा भक्कम आधार कोणी  दिला याचे महत्त्व बहिणाबाईंना अभिप्रेत असावे

Files

2.pdf

Files (193.7 kB)

Name Size Download all
md5:cf6c697db5e2793d3ed5988a4d8d6c4e
193.7 kB Preview Download