विठ्ठलतुकाराम घाडगे उर्फ बुवा म्हावशीकर : एक उपेक्षित क्रांतिकारक
Creators
- 1. साहाय्यक-प्राध्यापक, इतिहास विभाग, आर्टस् ॲन्ड कॉमर्स कॉलेज, आष्टा, ता.वाळवा, जि.सांगली.
Description
प्रस्तावना:
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून देशाला मु़क्त करण्यासाठी देशाच्या वेगवेगळया भागात, वेगवेगळया कालखंडात अनेक ज्ञात – अज्ञात क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी प्रत्यक्ष–अप्रत्यक्षरीत्या खूप मोठे प्रयत्न केले. अनेकांनी आपल्या घरादारावर, संसारावर तुळशीपत्र ठेवून फार मोठा त्याग केला. अनेकांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे बलिदान दिले. अनेकांनी सोसलेल्या यातनांमुळे, भोगलेल्या हाल-अपेष्टांमुळे आणि केलेल्या त्यागामुळे आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करु शकतो.ब्रिटिशांच्या पोलादी पकडीच्या राजवटीविरुध्द लढा देणे ही सोपी बाब नव्हती.परंतु क्रांतिकारकांच्या उदात्त ध्येयवादामुळे आणि अखंड प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झाले. अशा अनेक क्रांतिकारकांपैकी एक 'उपेक्षित क्रांतिकारक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल तुकाराम घाडगे उर्फ बुवा म्हावशीकर यांच्या योगदानाचा आढवा प्रस्तुत शोधनिबंधाद्वारे घेतला आहे.
Files
19..pdf
Files
(486.3 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:50aef17a8af9d75daec1a3e529bf8d25
|
486.3 kB | Preview Download |