सहकार पंढरीचा युगपुरूष : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील.
Creators
- 1. ( मराठी विभागप्रमुख ) कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी. ता . पारनेर जि. अहमदनगर
Description
पद्मश्रीच्या नावाशिवाय सहकार चळवळीचा इतिहासच लिहिता येणार नाही .”सहकार चळवळीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील होय” .पद्मश्री डॉ, विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म 12 ऑगस्ट 1997 रोजी झाला .त्यांचे पूर्ण नाव एकनाथराव विठ्ठलराव विखे पाटील महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे आद्यप्रवर्तक होय .अहमदनगर जिल्ह्यातील लोणी ब्रुद्रक ता.श्रीरामपुर या खेडयात एका शेतकरी कुटुंबात झाला. लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले .लहान वयात शेतीला सुरुवात केली. पद्मश्री जन्माला आले,तेव्हा त्या काळी शेतकऱ्याच्या जमीनी कर्जबाजारीपणामुळे सावकाराच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते. हे नेमके पद्मश्री हेरले. व्यवहार, बुद्धी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. 1923 मध्ये त्यांनी लोणी ब्रुद्रुक येथे सहकारी पतपेढीची स्थापना करून सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले .
पद्मश्री विठठलराव विखे पाटील सहकाराचे प्रणेते म्हणून ओळखले जातात, म्हणून त्यांचा जन्मदिवस 2014 पासून ‘शेतकरी दिन’ म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. कृषी औद्योगिक सहकार साखर कारखान्याचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेतकऱ्यांच्या भरीव आणि उल्लखणीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस मराठी तिथी प्रमाणे ‘नारळी पौर्णिमा’ या दिवशी ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत .आज महाराष्ट्रात सहकार चळवळीचा बराच प्रसार झाला आहे .सहाजिकच सहकार महर्षी म्हणून मिरवणारे अनेक पुढारी जागोजागी अढळुन येत आहे .परंतु सहकारमहर्षी या किताबाचे महाराष्ट्रातील सहकाराचे खरे मानकरी कोण असतील तर ते म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील होय .पद्मश्रीने 23 जानेवारी 1923 रोजी आपले जन्मगाव ‘लोणी बुद्रुक’ येथे लोणीबुद्रुक सहकारी पतपेढी स्थापन केली .ही पतपेढी भारतातीलच नव्हे, तर आशियातील सहकारी तत्त्वावर स्थापन होणारी पहिलीच पतपेढी ठरली .त्यानंतर त्यांनी गावोगावी सहकारी पतपेढी स्थापन करण्याची मोहीमच हाती घेतली .या सहकारी पतपेढ्याच्या माध्यमातुन गरीब व शेतकर्यांना आवश्यक ती मदत उपलब्द करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला .10 डिसेंबर 1929 रोजी ‘राजुरी’ या गावी विठठलरावांनी आदिवासी समाजासाठी सहकारी सोसायटीची स्थापना केली . १९४४ मध्ये त्यांनी सहकारी तत्वावर शेतीसंस्था स्थापन केली.विखे पाटील यांचा काही काळापुरता राजकारणाशी संबध आला. ब्राहमणेतर चळवळ व सत्यशोधक चळवळ या चळवळीतही त्यांनी भाग घेतला .या चळवळीतुन बहुजन समाजाला उन्नतीचा मार्ग निघु शकेल.असे त्यांना वाटत होते.तथापी मात्र त्यांनी राजकारणापेक्षा सहकारी क्षेत्राकडे आपले लक्ष केंद्रित केले . ब्रिटिश राजवट व सावकारशाहीच्या घट्ट विळख्यात ध्येयाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९५० ला सहकारी साखर कारखानदारी जन्माला घातली. त्यातून राज्यात देशात आणि जगातील अनेक राष्ट्रात परीवर्तनाचे नवे पर्व सुरू झाले.महाराष्ट्रतील सहकारी साखर कारखानदारीचे आद्यप्रवर्तक अहमदनगर जिल्ह्यातील ‘लोणी ब्रुद्रक’ या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्म. लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण, नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली. त्याकाळी शेतकऱ्याच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते, हे नेमके हेरून त्यांनी व्हवहारी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ‘लोणीबुदुक’ सहकारी पतपेढीची स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-बहार मंडळींना एकत्र आणून हामजूर सहकारी सोसायटीची स्थापना केली.
Files
8..pdf
Files
(602.3 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:f63caad461a020d410bdfb33e73d7a38
|
602.3 kB | Preview Download |