Published October 31, 2022 | Version v1
Presentation Open

प्लायमट्रिक आणि प्रतिकार प्रशिक्षणाचा आंतर महाविद्यालयीन हॉकी खेळाडूंच्या शारीरिक क्षमता आणि शरीरक्रियात्मक घटकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास

  • 1. (संशोधक) शारीरिक शिक्षण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (मार्गदर्शक) शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख श्री. पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय सिरशाळा, ता. परली वैजनाथ बीड (महाराष्ट्र)

Description

सारांश :

संशोधनात प्लायमेट्रिक आणि प्रतिकार प्रशिक्षणाचा आंतर महाविद्यालयीन हॉकी खेळाडूंच्या शारीरिक क्षमता आणि शरीरक्रियात्मक घटकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय संशोधन पद्धती मधील प्रायोगिक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. संशोधनात संशोधकाने विशुद्ध प्रायोगिक अभिकल्पातील पूर्वोत्तर परीक्षण समान गट या अभिकल्पाचा वापर केला. संशोधनात निवड करण्यात आलेली जनसंख्या म्हणून लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक मधील आंतर महाविद्यालयीन हॉकी खेळाडूंचा समावेश करण्यात आला. हॉकी खेळाडूंचे वयोमान १७ ते २१ वर्ष इतके होते. असे ऐकून जनसंख्या सुमारे २०० होती. ऐकून जनसंख्या पैकी ४० आंतर महाविद्यालयीन हॉकी खेळाडूं यामध्ये नियंत्रित गटात २० आणि प्रायोगिक गटात २० मुले हॉकी खेळाडूंचा समावेश केला होता. संशोधनात हॉकी खेळाडूंची निवड यादृच्छिक न्यादर्श नमुना तंत्र पद्धतीने निवड करण्यात आली होती. संशोधनात आंतर महाविद्यालयीन हॉकी खेळाडूंवर प्लायमेट्रिक आणि प्रतिकार प्रशिक्षणाचा परिणाम विषय अनुसरून शारीरिक क्षमता आणि शरीरक्रियात्मक घटकांची निवड करून अभ्यास करण्यात आला. प्रायोगिक गटातील हॉकी खेळाडूंवर प्लायमेट्रिक आणि प्रतिकार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. संशोधनात आंतर महाविद्यालयीन हॉकी खेळाडूंच्या शारीरिक क्षमता आणि शरीरक्रियात्मक घटकांचा मापन करण्यासाठी दिशाभिमुखता, वेग, हृदय दर आणि उच्छवसन क्षमता कसोटीचा वापर करण्यात आला होता. आंतर महाविद्यालयीन हॉकी खेळाडूंची कसोटीद्ववारे पूर्व आणि उत्तर चाचणी घेऊन माहिती प्राप्त करण्यात आली आणि संख्याशास्त्रीय विश्लेषणाद्ववारे प्राप्त माहितीवरून प्लायमेट्रिक आणि प्रतिकार प्रशिक्षण कार्यक्रमाची परिणाम कारकता तपासण्यात आली. संशोधनात आंतर महाविद्यालयीन हॉकी खेळाडूंच्या प्रायोगिक आणि नियंत्रित गटातील खेळाडूंच्या शारीरिक क्षमता आणि शरीरक्रियात्मक घटकांवर दिशाभिमुखता, वेग, हृदय दर आणि उच्छवसन क्षमता कसोटीच्या आधारे संख्याशास्त्रीय स्वाश्रयी नमुना ‘टी’ परीक्षकेद्वारे विश्लेषण केले असून कार्यमानाच्या प्राप्तांकद्वारे ‘टी’ मूल्य हे अनुक्रमे ७.४१, ८.८१, २.४८, १२.४ आढळून आले. प्राप्त ‘टी’ मूल्य ०.०५ सार्थकता स्तरावर सार्थक असल्याचे निष्कर्षावरून आढळून आले. म्हणून आंतर महाविद्यालयीन हॉकी खेळाडूंच्या नियंत्रित गटाच्या तुलनेत प्रायोगिक गटातील खेळाडूंच्या शारीरिक क्षमता आणि शरीरक्रियात्मक घटकामध्ये दिशाभिमुखता, वेग, हृदय दर आणि उच्छवसन कसोटीच्या कार्यमानात प्लायमेट्रिक आणि प्रतिकार प्रशिक्षण कार्यक्रमामुळे सार्थक फरक आढळून आला.

 

Files

1001142..pdf

Files (693.5 kB)

Name Size Download all
md5:c855242ff29043445164b320b94e9c80
693.5 kB Preview Download