आभासी चलन [Crypto Currency] वास्तविकता व गरज
Creators
- 1. क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज वाळवा ता. वाळवा जिल्हा सांगली [ महाराष्ट्र] अर्थशास्त्र विभाग
Description
आधुनिक काळात जगातील सर्वच देशांत पैशाला किंवा चलनाला खूप महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे. जगभर सुरू असणार्या आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्था गतिमान झाल्या आहेत. पैसा किंवा चलन हे देशाच्या विनिमयाचे साधन, मूल्यमापनाचे साधन , संपत्तीचा संचय, व संपत्तीच्या हस्तांतराचे एक महत्त्वाचे साधन म्हणून वेगाने विकसित झालेले आहे. अलीकडे चलन्क्षम दस्तऐवज व त्यांचे व्यवहारात महत्त्व वाढत असतानाच पैशाच्या संकल्पनेत क्रांतिकारक बदल होत आहेत, डिजिटायझेशन मुळे बहुतेक लोक “क्रेडिट कार्ड”, “डेबिट कार्ड,” “आर.टी.जी.एस” , “एन.ई.एफ.टी”., “फोन पे”, “गुगल पे” , यांच्या सहायाने व्यवहार करण्याला गती येत आहे. तरीसुद्धा जगातील ही सुविधा वापरणाऱ्या लोकांची सरासरी काढली तर पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक ऑनलाइन व डिजिटल व्यवहारापासून दूरच आहेत असे दिसते त्यातच 2008 च्या जागतिक महामंदीच्या काळात विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी खूप मोठ्या प्रमाणात चलन छपाई केली व विविध उपाय योजना राबवून आर्थिक मंदी कमी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अर्थकारणाच्या नैसर्गिक प्रवाहात अडचणी व बदल सुरू झाले व बिटकॉइन सारख्या आभासी चलनाचा त्यामधून जन्म झाला..
Files
27.pdf
Files
(686.1 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:08ce47898eeb0901b44d4dd92b47e672
|
686.1 kB | Preview Download |