"भाषिक संशोधन पद्धती एक अभ्यास"
Creators
- 1. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाविद्यालय राणीसावरगाव, ता.गंगाखेड जि.परभणी
Description
प्रस्तावना:
मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे भाषा आहे. मानवी जीवनाला भाषाशिवाय अर्थ नाही. भाषा ही मानवी जीवनाला प्राप्त झालेली फार मोठी देणगी आहे. भाषा ही मानवनिर्मित आहे. त्यामुळे मानवी भाव भावना भाषेमधूनच व्यक्त होतात. मानवी जीवनामध्ये आमलाग्र बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य हे फक्त भाषेमध्येच आहे. भाषा ही मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. भाषेची मानवी जीवनाशी समाज जीवनाशी अतूट नाते दिसून येते. माणूस जसा परिवर्तनशील आहे तशीच भाषा ही परिवर्तनशील आहे. कालपत्वे भाषेमध्ये बदल होत असतात. जगातील कोणतीही भाषा संकेतावर आधारलेली आहे. भाषा शिकणे म्हणजे संकेत शिकत असतो. एखाद्या भाषेच्या संकेत व्यवस्था आपल्याला माहित नसते ती भाषा आपल्याला कधीच येत नाही. आपल्याला रशियन, फ्रेंच भाषा कशामुळे येत नसते कारण त्या भाषेतील संकेत माहित नसतात. भाषेच्या ठेवा हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होते. समाज हा भाषेवर अवलंबून आहे. व भाषेवर समाज अवलंबून आहे.
Files
13..pdf
Files
(352.8 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:38db922c0ddeed05151441910a855064
|
352.8 kB | Preview Download |