शेतकरी कामगार पक्ष स्थापनेसाठी बहुजन नेतृत्वाचे योगदान
Authors/Creators
- 1. संशोधक विद्यार्थी, राज्यशास्त्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ, सोलापुर संशोधक मार्गदर्शक, राज्यशास्त्र विभागप्रमुख, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलुज ता. माळशिरस जि.सोलापुर
Description
प्रस्तावना :
शेतकरी कामगार पक्षाला पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इतिहासाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. महात्मा ज्योतीराव फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तेव्हा पासून ग्रामीण जीवनात खोलवर रुजलेली ही पहिली चळवळ होती. वर्गदृष्ट्या महात्मा फुले शेतक-यांचे प्रवक्ते होते. स्त्री शुद्रातिशुद्र शेतकरी व कामगार या सर्व शोषितांनी आत्मोद्वारासाठी संघटित व्हावे अशी प्रेरणा सत्यशोधक आंदोलनाने प्रथम महाराष्ट्रात दिली. ब्राम्हणेतर चळवळीचे परिणत रूप म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना होय. शेतकरी कामगार पक्षाला लाभलेले नेतृत्व म्हणजे बहुजन नेतृत्व होय. हे सत्यशोधक चळवळ व ब्राम्हणेत्तर चळवळी मधून तयार झाले. धर्म क्षेत्रातील गुरूत्वाप्रमाणे राजकीय क्षेत्रातील पुढारीपण हे विशिष्ट लोकांच्या हातीच सतत राहिले पाहिजे. अशा वृत्तीच्या काँग्रेसमधील काही मंडळीना काँग्रेस मधील बहुजन समाजाचे वाढते वजन खपेनासे झाले असून बहुजन समाजासाठी निर्भीडपणे भांडणाऱ्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा भूमिगत पण पध्दतशीर प्रयत्न करीत असत. यातून पुढे बहुजन नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.
Files
12..pdf
Files
(371.1 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:792075e4bccfeb3b8685184253723a15
|
371.1 kB | Preview Download |