युगांत' आणि 'साई' एक दृष्टिक्षेप
Description
प्रास्ताविक - प्राचीन महारठ्ठी, मरहठ्ठी भाषा, महाराष्ट्र प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा, असा मराठी भाषेचा प्रवास सांगता येतो. भारतातील कोणत्याही राज्याला राष्ट्र हे प्रत्यय जोडलेले दिसून येत नाही. महाराष्ट्राव्यतिरिक्त महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हटले जाते. कारण या राज्याला थोर संतांचा, पराक्रमी राजांचा, थोर समाजसुधारकांचा, विचारवंतांचा आणि दैवी शक्ती प्राप्त झालेल्या साईबाबासारख्या देवतुल्य माणसांचा वारसा लाभलेला आहे. आजवर झालेल्या महाराष्ट्राच्या संबंध जडण-घडणीमध्ये या थोर माहात्म्यांचे आणि संतांचे भरीव योगदान मिळालेले आहे. म्हणून भारतामध्ये आणि समस्त विश्वामध्ये महाराष्ट्राने आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजमितीला महाराष्ट्राने बदलत्या जगाबरोबर प्रचंड भौतिक प्रगती केलेली आहे. तरीपण साधूसंतांच्या शिकवणुकीचे आणि संस्कारांचे महत्त्व टिकून राहिलेले आहे. कारण वरकरणी कल्याणकारी आणि आनंददायी दिसणारी ही भौतिक प्रगती कितीही आल्हाददायी वाटत असली तरी, तिच्या म्हणून काही अंगभूत मर्यादा आहेत.
Files
19..pdf
Files
(384.1 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:7ef79f0dc4f4a3b332ba613a846c7983
|
384.1 kB | Preview Download |