सत्यशोधकी जलसे: प्रयोजन व स्वरूप
Description
इ.स. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर शिक्षण, संस्कृती, धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादी क्षेत्रात प्रबोधन आणि जागृती केली. सत्यशोधकी साहित्य परंपरेने लोकवाद्य, लोकसंगीत, लोकप्रयोज्य कला यातील सामथ्र्य अचूकपणे ओळखले आणि त्यांची प्रभावीपणे निर्मिती केली. ‘सत्यशोधकी जलसे’ हा असाच लोकप्रयोज्य कलाप्रकार आहे.
सत्यशोधक जलसा चळवळ सत्यशोधक चळवळीचेच एक महत्वाचे कृतिशील अंग होते. जलशामधून सत्यशोधक विचार, तत्वज्ञान, संस्कृती व कृतींचा प्रसार झालेला आहे सत्यशोधकी जलशांनी ग्रामीण भागात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे प्रबोधन घडविले. हजारो वर्षापासून ज्ञानापासून वंचित असलेल्या समाजाला ज्ञानाच्या परिघात आणले. सत्यशोधकी जलसे पाहून गावोगाव आणि घराघरात फार मोठी लोकजागृती घडली. सर्व समाज धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून मुक्त होऊ लागला. सत्यशोधक जलशातील पदे आणि वगांची रचना करणारे लेखक-कवी ग्रामीण भागातील आणि कष्टकरी वर्गातीलच होते. ते विविध जातीस्तरातील होते. त्यांची भाषा अस्सल मराठी वळणाची आहे.
आद्यसत्यशोधकी लोकशाहीर भीमराव महामुनी यांनी इ.स. 1890 च्या दरम्यान सत्यशोधकी जलशांचा प्रारंभ केला. त्यांनी लोकरंजनातून प्रबोधन घडविले. जलसाकारांनी तमाशाकडून गण, गौळण, लावणी, बतावणी, वग या घटकांचा रूपबंध स्विकारला पण त्यातील आशय सत्यशोधकी तत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेला होता. अज्ञानामुळे लोकांचे होणारे शोषण, कर्मकांड व अंधश्रध्देमुळे होणारी अधोगती जलशातून चित्रीत झाली आहे.
Files
Files
(63.8 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:009b652d93945fd6b5ee7e740e35e057
|
63.8 kB | Download |