डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार
- 1. एस. बी. पाटील कॉलेज, मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर
Contributors
Description
प्रस्तावना:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाचे महान शिल्पकार होते. त्यांचे जीवन हा संघर्ष, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि परिवर्तनशील विचारांचा उत्तम नमुना आहे. भारताच्या इतिहासात असे काही मोजकेच व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांनी आपल्या कार्याने आणि विचारांनी संपूर्ण समाजाची दिशा बदलली. डॉ. आंबेडकर हे त्यातीलच एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते.ब्रिटीश राजवटीत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील एका मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केवळ शिक्षणच घेतले नाही, तर समाजातील सर्व थरांमध्ये समता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांची रुजवण केली. त्यांची ही जडणघडण आणि संघर्षाचा प्रवास आजही संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी ठरतो. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे मसुदा समिती अध्यक्ष म्हणून नेतृत्व केले आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता, मूलभूत अधिकार, सामाजिक न्याय यांसारख्या संकल्पनांना मूर्त स्वरूप दिले.
डॉ. आंबेडकरांचे कार्य केवळ कायद्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सामाजिक समता आणि आर्थिक सुधारणा यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. अस्पृश्यता निर्मूलन, महिलांचे अधिकार, कामगार कल्याण, औद्योगिकीकरण, पाणी व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी प्रस्थापित जातीय व्यवस्थेविरोधात संघर्ष केला आणि समतेच्या मूल्यांवर आधारित समाजाच्या उभारणीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले."शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा त्यांचा संदेश आजही लाखो लोकांना प्रेरित करतो. आधुनिक भारताच्या जडणघडीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे. म्हणूनच त्यांना "आधुनिक भारताचे शिल्पकार" म्हटले जाते. या संशोधन पेपरद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे आणि कार्याचे सखोल विश्लेषण करून त्यांच्या आधुनिक भारताच्या निर्मितीतील भूमिकेचा अभ्यास करण्यात येणार आहे.
Files
2-127-133.pdf
Files
(327.5 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:09a43b03f8233541075fda9bbd946a2a
|
327.5 kB | Preview Download |