Published February 28, 2025 | Version v23
Journal article Open

हडप्पा संस्कृतीचा आधुनिक भारतावर परिणाम

  • 1. इतिहास विभाग प्रमुख, स्व. निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी / तुपकर ता. लाखनी जि. भंडारा

Contributors

Description

सारांश –

हडप्पा संस्कृती भारतीय उपखंडातील पहिली सुव्यवस्थित नागरी संस्कृती मानली जाते, ज्याचा काळ इ. स.पूर्व २८००  ते २५००  दरम्यान होता. हडप्पा संस्कृतीचा प्रारंभ इ. सन. पूर्व ३५०० पर्यन असू शकतो. सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली हि संस्कृती शहरी रचना, स्थापत्यकला, व्यापार, अर्थव्यवस्था,लेखन   प्रणाली,  धर्म सामाजिक संरचना,व शेती या क्षेत्रात  अंत्यत  प्रगत  होती.आधुनिक भारतीय समाज,नागरी जीवन,आणि तंत्रज्ञानावर या प्राचीन संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसून येतो.हडप्पा संस्कृतीतील शहरे अत्यंत नियोजनबद्ध होती. यातील  प्रमुख  वैशिष्ट्य  म्हणजे  रस्त्यांचे  नीटनेटके  व्यवस्थापन, पक्क्या विटांची घरे, उत्कृष्ट जलव्यवस्थापन पद्धती, आणि  सार्वजनिक  स्वच्छतेवर  विशेष लक्ष.हडप्पा  संस्कृतीतील गटारे  आणि  पाणीपुरवठा  प्रणाली पाहून त्या काळातील नगररचनेची परिपूर्णता लक्षात येते. आजच्या भारतीय शहरांच्या विकासात हरप्पा संस्कृतीच्या नगररचनेचा अप्रत्यक्ष प्रभाव आहे. रस्ते नियोजन, स्वच्छता व्यवस्थापन,आणि  पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन यासारखे घटक हरप्पाच्या नगरयोजनेवर आधारित आहेत. स्थापत्यकलेतही हरप्पा संस्कृती अत्यंत प्रगत होती. पक्क्या विटांच्या इमारती,गढी, जलस्त्रोतांसाठी  तलाव,धान्य साठवण्याचीगोदामे, तसेच शैलीचा प्रशस्त सभागृहे या संस्कृतीच्या स्थापत्यकलेची ओळख ठरली आज भारतीय वास्तुकलेत या शैलीचा ठसा पहायला  मिळतो. घरांचे बांधकाम, पाण्याची साठवणूक, तसेच सामाजिक    स्थळांचा रचना ही स्थापत्यकलेतील काही घटक आधुनिक वास्तुकलेतही समाविष्ट आहेत. व्यापार आणि आर्थिक प्रणाली मध्येहि हरप्पा संस्कृती अत्यंत प्रगत होती. ते विविध वस्त्र धातू, मातीचीभांडी,दागिने,शिल्पे यांचा  उत्पादन आणि व्यापार करीत असत.समुद्रमार्ग आणि स्थल मार्गाचा वापर करून त्यांनी व्यापारी संबंध निर्माण केले. आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेतील व्यापारी संबंधात हरप्पा संस्कृतीच्या व्यापार पद्धतीचा प्रभाव दिसून येतो. लिपी आणि लेखनप्रणालीही  हरप्पा  संस्कृतीत  प्रचलित होती.या संस्कृतीतील लिपी अद्याप पूर्णपणे  उलगडली  नसली  तरी ती एक  संगठीत  लेखन प्रणाली असल्याचे संकेत मिळतात. आधुनिक लिपीच्या विकासात हरप्पा लिपीतील काही वैशिष्ट्यांचा प्रभाव  आहे .धर्म  आणि सामाजिक  रचना  हरप्पा  संस्कृतीत महत्वपूर्ण होती. वर्गीय व्यवस्था,धार्मिक विधी, पुजेची पद्धती, यांचा  ठसा भारतीय  धार्मिक व सामाजिक व्यवस्थेत आढळतो.कृषी  क्षेत्रात हरप्पा संस्कृतीतील  पिकांची  लागवड,सिंचन  प्रणाली आणि  जलस्त्रोतांचे नियोजन हे  तंत्र आजच्या भारतीय कृषी व्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देतात.सारांशरीत्या असे म्हणता येईल कि, हरप्पा संस्कृतीने आधुनिक भारताच्या अनेक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम केले आहेत. तिच्या नागरी रचना, स्थापत्यकला, व्यापारी पद्धती, सामाजिक आणि धार्मिक रचना, तसेच कृषी तंत्र यामधील योगदान भारतीय समाजाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक विकासात महत्वपूर्ण ठरले आहे.

Files

x23.pdf

Files (665.3 kB)

Name Size Download all
md5:a61e7de0462e506ebe40714331949626
665.3 kB Preview Download