Published January 30, 2025 | Version v1
Journal article Open

स्वामी दयानंद सरस्वती : आर्य समाज व शैक्षणिक तत्त्वज्ञान

  • 1. खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई

Description

एकोणिसाव्या शतकात भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी घडून येत असताना.त्यामध्ये आर्य समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक,धार्मिक शैक्षणिक सुधारणा होत असताना स्वदेश, स्वधर्म याविषयीच्या अस्मितेला संजीवनी देण्याचे कार्य आर्य समाजाने केले. पाश्चिमात्त्य धर्मविचार, आचार व ज्ञान हेच केवळ सर्वश्रेष्ठ नसून भारतीय संस्कृती आणि तिचे तत्त्वज्ञानही श्रेष्ठ आहे हे भारतीयांना आणि परीक्षकांना आर्य समाजाने पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीतींवर हल्ला करत असताना हिंदू धर्माला आधुनिक स्वरूपामध्ये पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आर्य समाजाने केला; परंतु हिंदू धर्माच्या स्वरूपामध्ये होत्या त्या स्वरूपात आर्य समाजाला पुनरुज्जीवित करावयाचे नव्हते, तर हिंदू धर्मातील ज्या बाबी योग्य आहेत, त्यांना आधुनिकतेची जोड द्यावयाची होती. म्हणजेच प्राचीन योग्य परंपरांचा अभिमान आणि आधुनिकता या दोन्ही बाबी त्यांना स्वीकारायच्या होत्या, म्हणूनच त्यांनी गुरुकुल पद्धतीबरोबरच इंग्रजी शिक्षणाकडेही लक्ष दिले. भारतीय प्रबोधनाच्या चळवळीत शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, हे त्यांनी जाणले. त्यामुळे या काळामध्ये आर्य समाज हा सर्वांत जास्त लोकप्रिय ठरला. त्याने भारतीय जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला.

Files

S060773.pdf

Files (483.1 kB)

Name Size Download all
md5:f2cc51076250d8c7701702a9f2aee72a
483.1 kB Preview Download