महात्मा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य
Contributors
Editor:
Description
जोतीराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा फुले या नावाने लोकप्रिय असणारे समाजसुधारक हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. त्यांचे मुळगाव कटगुण (सातारा) होते. पण त्यांचा जन्म धनकगडी- पुणे येथे ज्योतिबाच्या यात्रे दिवशी झाला, म्हणून हे नाव ठेवले. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते, पण वडील फुले विकायचे म्हणून फुले आडनाव पडले. त्यांचे प्राथमिक शिक्षण १८३४-१८३८ मध्ये पंतोजीच्या शाळेत झाले. नंतर वडीलांनी त्यांचे शिक्षण बंद केले व त्यांच्या फुलांच्या व्यवसायात गुंतवले. पुढे उर्दू शिक्षक गफारबेग मुन्शी व मि. लिजीट यांच्या समजवण्याने त्यांच्या शिक्षणाची पुन्हा सुरुवात झाली. स्कॉटिश मिशनऱ्याच्या शाळेत माध्यमिक शिक्षण घेताना त्यांना काही मित्र मिळाले ज्यांचा फुलेंच्या सामाजिक कार्यात मोलाचा वाटा आहे. वयाच्या तेराव्या वर्षी नायगाव येथील खंडोजी नेवसे (झगडे पाटील) यांच्या ९ वर्षाच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघेही भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहे. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून फुलेंची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विठ्ठलराव वडेकर यांनी सन्माननीय ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली होती.
Files
110361.pdf
Files
(487.0 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:9fc19718d8973fbd8f49557f0d1f6ddd
|
487.0 kB | Preview Download |