Published June 30, 2024 | Version v23
Journal article Open

महाराष्ट्राच्या लोकसंगीतातील लोकनाट्य: तमाशा

  • 1. सहाय्यक प्राध्यापक संगीत विभाग, श्रीमती सु .रा मोहता महिला महाविद्यालय, खामगाव जि.बुलढाणा

Contributors

Description

 

            

महाराष्ट्र हे संत, महात्मे, महर्षी, नायक, नायिका आणि साहित्य आणि कलेचे माहेरघर असलेले  राज्य आहे. येथील ग्रामीण भागातील अज्ञानी, अंधश्रद्धाळू, गरीब, आजारी समाजाला पुढे आणण्यासाठी समाजसुधारकांबरोबरच गायक,वादक कलाकार, कवी, संगीतकार यांनी परिश्रम घेतले आहेत. आपल्या कलेतून त्यांनी मनोरंजन, प्रबोधन, जागृती, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवून समाजाला नवी दिशा दाखवली. प्रस्तुत शोधपत्रात उदिष्टे, व्याप्ती व मर्यादा, संशोधन कार्यपद्धती, तमाशाचा अर्थ, उगम, त्यातील पात्र, प्रकार या संदर्भात विस्तृत विवेचन केले आहे .

उद्दिष्टे: १) तमाशा या लोकनाट्याची व त्या मधील गीतांची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहचविणे.

2) तमाशा या लोप पावत  चाललेल्या लोकनाट्याचा व त्यामधील गीतांचा प्रचार-प्रसार  करणे.

व्याप्ती व मर्यादा: तमाशा हा महाराष्ट्राच्या लोकसंगीतातील गायन, वादन, नृत्य व नाट्याचा प्रकार  असला तरी त्याचा आस्वाद महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यातील संगीतप्रेमी सुद्धा घेवू शकतात.

Files

110556.pdf

Files (561.2 kB)

Name Size Download all
md5:1a0bfcf4c0cb293dec0d50d608cbebb4
561.2 kB Preview Download