महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण विषयक विचार व कार्य
Creators
Contributors
Researcher:
- 1. अर्थशास्त्र विभाग प्रमुख, चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा जि. चंद्रपूर
Description
एकोणविसाव्या शतकात पाश्चात्य देशांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात जी प्रगती साध्य केली त्या प्रगतीचे श्रेय शिक्षणाला जाते. ही प्रगती भारतात साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दूरदृष्टीने हेरले. यातूनच त्यांनी शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. वर्षानुवर्षे अन्यायाचा वाटेकरी, उच्चवर्णीय व सनातन यांच्या शोषणाचा बळी ठरलेल्या बहुसंख्यक घटकांची व विशेष करून स्त्री व शूद्र, अतिशूद्र यांची अशा जंजाळातून सुटका करण्यासाठी त्यांच्या शिक्षणाच्या प्रचार व प्रसारावर अधिक भर दिला. शिक्षणविषयक केवळ तत्वाची मांडणी न करता त्या तत्त्वाला ज्योतिरावांनी स्वतःच्या कार्यातून चालना दिली. समाजातील बहुसंख्य घटकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. याचे प्रमुख कारण म्हणून त्यांनी वर्णव्यवस्थेवर कठोर प्रहार केला. समाजाच्या सर्व घटकापर्यंत शिक्षण पोहचावे याकरिता त्यांनी साहित्याची निर्मिती तसेच सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना केली. त्यामुळे त्यांच्या शिक्षणविषयक कार्याला गती मिळाली. पाश्चिमात्य देशापेक्षा भारतातील सामाजिक स्थिती ही भिन्न असून या स्थितीनुसारच भारतात शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध व्हावी हे ब्रिटिश शासनाला त्यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले व शिक्षण ही कोणत्या एका घटकाची मक्तेदारी न होता सर्वसामान्याला त्याची उपलब्धता व्हावी असे परखड मत त्यांनी मांडले. स्त्रियांना कुटुंब समाज व देशाचा महत्त्वपूर्ण घटक मानून त्यांना पुरुषाबरोबरच समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्याकरिता त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. त्यांच्या शिक्षणविषयक कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे अनमोल असे योगदान लाभले. महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक विचार व कार्य हे राष्ट्र निर्माणासाठी स्त्रिया व शूद्राती -शुद्रांना शिक्षण पद्धतीत वेळोवेळी सुचविलेल्या सुधारणा अशा विविध महत्त्वपूर्ण पैलूला रेखांकित करणारे आहे.
Files
x73.pdf
Files
(415.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:69acd639ed4509684d83a24de5fb5dec
|
415.7 kB | Preview Download |