Published May 30, 2024 | Version v1
Journal article Open

सामाजिक समता व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य

Authors/Creators

  • 1. सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, गि. द. म. कला, के. रा. न वाणिज्य व म. धा. विज्ञान महाविद्यालय, जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव

Description

 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाचे संविधान लिहून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश वासियांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार कायदेशीर पद्धतीने प्रदान केले म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी खर्च केले समाजातील विषमता नष्ट झाली पाहिजे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले बाबासाहेबांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि अभ्यासांती बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांनी बौद्ध क्रांती घडवून आणली कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे समाजाला एकसंघ ठेवू शकते समाजात  समता प्रस्थापित करू शकते बाबासाहेबांनी फक्त एका विशिष्ट समाजासाठी किंवा धर्मासाठी काम केले नाही तर समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्यांचा हा प्रयत्न त्यांनी अनेकदा कृतीतून सिद्ध केला अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो असे त्यांनी समाजात सांगून जागृती निर्माण केली समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले स्वातंत्र्य समता बंधुत्व धर्मनिरपेक्षता व सहिष्णुता ही तत्व बाबासाहेबांनी भारतीयांना दिली म्हणून त्यांना सामाजिक  समतेचे शिल्पकार असेही म्हटले जाते सामाजिक समताआणि मानवतावादी मूल्य समाजात रुजवण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.

Files

x45.pdf

Files (645.8 kB)

Name Size Download all
md5:944cc303722f7231927f48a7eed4eb81
645.8 kB Preview Download