मराठी कवितेवर जागतिकीकरणाचा परिणाम
Authors/Creators
Contributors
Researcher:
Description
प्रस्तावना:
जागतिकीकरण ही संकल्पनाच मुळात बहुआयामी बहुधर्मी स्वरूपाची अशी आहे. आज जागतिकीकरणाचा प्रभाव संपूर्ण भारतभर नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पडला आहे. किंबहुना जीवनाच्या सर्व क्षेत्रावर पडला आहे. याला साहित्यक्षेत्र अपवाद नाही कारण साहित्य हा समाज मनाचा आरसा आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. जागतिक वाङमयीन आदान प्रदान वाढले. याचा परिणाम सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,आर्थिक स्तरावर झाला. त्यामुळे साहित्याच्या कक्षा रुंदावल्या आपल्या मराठी साहित्याला फार मोठी परंपरा आहे. संतांनी प्राचीन व अर्वाचीन साहित्यिकांनी आपापल्या पद्धतीने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. कालांतराने औद्योगीकरणाने यांत्रिकीकरण आधुनिकीकरण आणि आता जागतिकीकरणाने मानवी मन ढवळून निघाले याचाच परिणाम म्हणून मराठी साहित्यात कथा कादंबरी बरोबर कवितेनेही आपले रूप पालटले आणि एक नवी दिशा घेऊन कवितेत अमुलाग्र बदल होत गेले.
जागतिकीकरणाचा परिणाम साधारणपणे १९८० नंतरच्या कवितेत प्रामुख्याने दिसू लागला. तो पुढे पुढे अगदी पक्व प्रमाणात विकसित होऊ लागल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन लोकसाहित्यातून ओवी भारुड पोवाडा इत्यादीतून प्रकटले आहे. पुढे प्राचीन कवितेने त्यामध्ये मोलाची भर घातली पुढे अर्वाचीन कवितेने कविता या वा•डमय प्रकाराला आणखीन प्रगल्भ केले आणि वेगवेगळ्या आशय अभिव्यक्ती आणि विषयाच्या दृष्टिकोनातून एक प्रकारची समृद्धता आली. १९८० नंतर मराठी कवितेवर जागतिकीकरणाचा प्रभाव वाढला आणि एक वेगळी अशी कविता रसिक वाचकांच्या समोर आली. प्रस्तुत शोधनिबंधाकरिता जागतिकीकरण आणि मराठी कवितेतील परिणाम हा विषय निवडला आहे.
Files
x6.pdf
Files
(429.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:ea5598a20bb7156c717c9e625272470b
|
429.6 kB | Preview Download |