There is a newer version of the record available.

Published March 23, 2024 | Version v65
Journal article Open

बालविवाहाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

Description

प्रस्तावना:-  

भारतीय समाजाचा अभ्यास करताना तो काळाप्रमाणे कोणकोणत्या आव्हानांना सामोरे गेला हे पाहणे मोठे उद्बबोधक आहे. विशेषतः स्त्रीयांचा विकास आणि प्रश्न याची जेंव्हा जेंव्हा चर्चा होते तेंव्हा एका गोष्टीचा नेहमी उल्लेख केला जातो तो म्हणजे बालविवाह. भारतीय समाजात विवाहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. समाजाचे सातत्य टिकवणारी स्त्री आज वेगळ्याच समस्येला सामोरे जात आहे, ती म्हणजे बालविवाह. भारतात होणाऱ्या एकूण विवाहात 40% बालविवाह होतात. बघा किती गंभीर प्रश्न आहे? विवाहाला स्त्री जीवनात विशेष महत्त्व आहे. विवाह करताना कोणी-कोणासी करावा? कोणत्या वयात करावा? याविषयी इतिहासात अनेक लिखाण विचारवंतानी केलेले आहे. विशेषतः विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी “विवाह संस्थेचा इतिहास” या पुस्तकात याविषयी भरभरून लिहिले आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत बालविवाहाचा इतिहास पाहणे मोठे दिव्य आहे. त्यामुळे मी या शोधनिबंधात बालविवाहाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. 

Files

64.pdf

Files (484.6 kB)

Name Size Download all
md5:1aed4acce4460d59d76bcab6d1ee30f2
484.6 kB Preview Download