भारतीय स्वांतत्र्यलढ्यातील उपेक्षित विरंगणा : राणी झलकारी
Creators
Description
प्रस्तावना:
ज्या -ज्यावेळी भारतावर परकीय अक्रमणे झाली त्या-त्यावेळी आदिवासी जमातीनी त्यांना अत्यंत प्रखरपणे विरोध केला. आदिवासी स्त्री पुरुषांचे योगदान खुप मोठे आहे. भारतीय स्वांतत्र्यलढयात आदिवासीचा सुवर्णअक्षरानी लिहून ठेवावा असा गौरवशाली इतिहास आहे. आदिवासी क्रांतीकारकांचा उपेक्षित इतिहास समाजासमोर मांडण्याचे कार्य आदिवासी लेखकांनी केले आहे. मराठी वाड्मयात आदिवासी साहित्याने मोलाचे असे स्थान निर्माण केलेले आहे. भारतीय स्वांतत्र्यलढयात अनेक वीर पुरुष, वीर स्त्रिया, क्रांतिकारक पुरुष, संत आणि आदिवासी समाज बांधवांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हे समाजबांधवांसाठी महत्वाचे आहे. इस्लामच्या आक्रमणाविरुद्ध लढताना राणी दुर्गावतीपासून ते पुंजा भिल्लापर्यंत अनेक आदिवासी शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदानही दिले. आदिवासींनी जे संघर्ष केले, त्या संघर्षामध्ये आदिवासी वीरांनी या संघर्षात आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. शुरवीर आदिवासीच्या रक्ताने लिहिलेल्या या इतिहासाची तेजस्वी पाने मात्र भारतीय इतिहासात उपेक्षित राहिली. आदिवासी स्त्रियांनीही रणभूमीवर आपले कर्तृत्व गाजवले आहे. अशीच एक आदिवासी उपेक्षित विरंगणा राणी झलकारीचे उपेक्षित व्यक्तिमत्व या लेखात मांडले आहे.
Files
25.pdf
Files
(778.2 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:a57d6d508b733bc6c29e5814f0ab9c33
|
778.2 kB | Preview Download |