ग्रामीण जीवनातील शेतीचे महत्त्व
Authors/Creators
Description
प्रस्तावना -
भारत हा कृषी प्रधान किंवा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात मोठ्या प्रमाणावर लोक शेती क्षेत्रावर आपला उदर निर्वाह भागवतात. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हजारो वर्षांपासून आपल्या देशात आपण शेती करत आहोत, परंतु अजून सुद्धा शेती पूर्णपणे विकसित झाली नाही. अजून सुद्धा लोक पारंपरिक पद्धतीने शेती करतात. स्वातंत्र्यानंतर भारत देशाची अन्नाची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला इतर देशांकडून धान्य आयात करावे लागत असे. भारतात शेती आधुनिक व परंपरागत पद्धतीने केली जाते. भारत देशात जवळपास निम्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. म्हणजेच निम्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर जीवन जगत आहे. यामध्ये बहुतेक लोक अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे त्याला अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी म्हटले जाते. ते शेती करतात. पण त्याच्यातून उत्पादन फार कमी असते. त्याच्यातून तो आपल्याकडून कुंटुबाचे पालन पोषण करु शकत नाही. त्याला मजुरी करावी लागते. जवळपास २०-३० वर्षांपूर्वी पिकाच्या लागवडीसाठी जवळजवळ संपूर्ण पावसाळ्यावर अवलंबून राहावे लागत असे, परंतु आता आपण धरणे, कालवे, नळ विहिरी आणि पंप-संच तयार केले आहेत. याशिवाय आपल्याकडे आता चांगली खते, कीटकनाशके आणि बियाणे आहेत ज्यांच्या मदतीने आपण पूर्वीपेक्षा अधिक धान्य पिकवू शकतो. ग्रामीण भागातील बहुतांश लोकं शेती करतात. म्हणून ग्रामीण जीवनात शेतीचे महत्त्व अभ्यासण्याचा प्रयत्न सदर शोध निबंधात करण्यात आला आहे.
Files
23..pdf
Files
(494.3 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:d10bde2d89449b9948f6c86e5c8210da
|
494.3 kB | Preview Download |