भरड धान्याचे पोषण विषयक महत्त्व आणि आहारातील स्थान
Creators
Description
प्रस्तावना -
संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. विविध स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्यासाठी तृणधान्ये चा आहारात वापर पुन्हा एकदा वाढविणे, त्यांच्या उपयुक्ततेबाबत समाजात जनजागृती करणे अत्यंत जरुरीचे आहे. तृणधान्याचा आहारात समावेश आरोग्यासाठी गरजेचा आहे ही बाब नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून पटवून देण्यात येत आहे.
नवीन पिढीच्या व लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ जसे की, ब्रेड, बिस्किट, केक, इडली, डोसा, चकली इत्यादी पदार्थ पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करुन बनविता येतात. असे पदार्थ बनवून त्यांचा आहारात सामावेश वाढविणे आवश्यक आहे. त्यास तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने मदत होईलच. भारताने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे उचललेले पाऊल हे भारताच्याच नव्हे तर, सर्व जगाच्या पोषण आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.
Files
73..pdf
Files
(515.6 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:f5ffd67a5af93b15dfc167fc084df817
|
515.6 kB | Preview Download |