Published October 20, 2023 | Version v1
Journal article Open

पर्यावरण संवर्धनातून शास्वत विकास

Description

प्रस्तावणा :-

मानवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. मानवाने पर्यावरणातील नैसर्गिक साधनसामग्रीच्या सहाय्याने आर्थिक विकास साधला पण नैसर्गिक साधनसामग्रीच्या अतिरिक्त वापरामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली. परिणामतः भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषन, जल प्रदूषन, हवा प्रदूषन यासोबत हवामानातील बदल व ग्लोबल वार्मिंग या सारख्या अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. मानवाच्या स्वार्थी वृत्ती मुळे पर्यावरणाचे व पृथ्वीचे संतुलन बिघडत चालले आहे. त्यामुळेच त्सुनामी, वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ अशा अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. आज आपण पाहत आहो की, हवामान बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर होत असुन त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. वातावरणीय बदलामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. कधी काही भागात जोरदार अतिवृष्टी होते तर कुठे गारपीट होते. शेतातील उभी पिके उद्ध्वस्त होऊन शेतक-यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. त्यामुळेच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकरी व गरीब वर्ग यांना याची जास्त झळ पोहचते. शाश्वत शेती करायची असेल तर वातावरणातील बदल समजून घेतला पाहिजे. 2030 पर्यंत काही भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार असून, पावसाचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. तापमान वाढ आणि बदलत्या हवामानामुळे नदी, ओढयांचे, विहिरींचे पाणी आटत चालले आहे. पाण्याचे खोत बंद झाले आहेत. जगभर जंगलतोड होत असुन त्याचा परिणाम पर्यावरणावर त्या सोबतच मानवी समाजावर होऊन 

Files

16..pdf

Files (361.5 kB)

Name Size Download all
md5:2fc8f43bed6aed451812eb6b00dd02be
361.5 kB Preview Download