पेशवे व आंग्रे संबंध (इ.स. १७४० पर्यंत)
Creators
Description
सारांश :
बाळाजी विश्वनाथ हे मुळचे कोकणाचे होते. तर आंग्रे घराणे देखील कोकणात पराक्रम गाजवत होते. कान्होजी आंग्रेचे वडील व आजोबा हे शिवरायांच्या आरमारी सेवेत असल्याचा उल्लेख मिळतो. बाळाजीने सिद्दीच्या जाचाने कोकण सोडून देशावर स्थाईक झाले. आपल्या अंगच्या उपजत गुणांमुळे व कर्तुत्वामुळे बाळाजीच्या भाग्याच्या उदय होऊन ते पेशवे या पदास पोहचले. शाहुच्या राज्यकारभाराची घडी बसविण्यासाठी बाळाजीचा सिंहाचा वाटा होता. कान्होजीस शाहू पक्षात आणून त्यांनी मोलाची कामगिरी करून मराठी राज्याचा पश्चिम किनारा सुरक्षित ठेवला. शाहुच्या राज्याचे ते आधारस्तंभ होते. पश्चिम किनाऱ्यावर सिद्दीच्या बंदोबस्त करण्यात पेशव्याने कान्होजी आंग्रेस सहकार्य केले होते. बाळाजी विश्वनाथाच्या पश्चात बाजीरावाने कान्होजी आंग्रेला पोर्तुगीज व इंग्रजांच्या या संयुक्तांच्या विरोधात मदत केली. सेखोजी आंग्रेने बाजीराव पेशव्याला जंजिरा मोहिमेत पूर्ण सहकार्य केले. मानाजी व संभाजी यांच्या वादात पेशव्यांनी मानाजीला सहकार्य केले. आंग्रे दौलतील तंटा मिटविण्यासाठी बाजीराव पेशव्याने आंग्रे दौलतीचे दोन भाग करून त्यांची शक्ती विभागली.
Files
15..pdf
Files
(388.5 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:b1dd1445b00eb0fb9e82789996c5a54e
|
388.5 kB | Preview Download |