" साहित्यिक प्रा. देवबा पाटील यांच्या कथासाहित्यातील कृषिजीवननिष्ठ स्त्रिव्यक्तिरेखांचा अभ्यास.."
Creators
Description
गोषवारा :-
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्य विश्वात साहित्य प्रवाहाची विविध दालन निर्माण झाली. स्वातंत्र्यपूर्वी महात्मा गांधीजींनी " स्वयंपूर्ण खेडी " या उद्देशाने " खेड्याकडे चला " हा मूलमंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर झाली तर राष्ट्राची प्रगती होवून चेहरामोहरा बदलेल , हा त्यामागे एकमेव उद्देश होता. ग्रामीण लोकजीवनात आमुलाग्र बदल व्हावा , खऱ्या अर्थाने ही त्यामागे प्रेरणा होती. स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण जीवनातील अनेक प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत. कदाचित हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन 1960 नंतरच्या नवीन पिढीतील लेखक मंडळींनी ग्रामीण जीवन आणि ग्रामीण जीवनातील ज्वलंत प्रश्न साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे .आज बदलत्या काळांनुरूप खेड्याचे विविध अंगी नवीन प्रश्न अनेक साहित्य क्षेत्रातील लेखकमंडळी ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून मांडताना दिसत आहेत कारण काही तथाकथित टीकाकारही , " आज खेडे संपूर्ण बदलले आहे. या नव्या खेड्याचे चित्रण ग्रामीण साहित्यात नाही. सबब ते साहित्य जुने ! अशी जाता जाता टीका करीत आहेत. यामुळे नव्याने उदयाला येणारे काही लेखक ही टीका लक्षात घेऊन नवनवी अनुभवक्षेत्रे ग्रामीण साहित्यात आणण्यासाठी धडपडतात ."( पृष्ठ क्र. 74 ग्रामीण साहित्य, स्वरूप आणि समस्या ) मराठीतील साहित्यिक प्रा. देवबा पाटील यांनी बदलते ग्रामीण जीवन आणि त्या ग्रामीण जीवनाचे वास्तव प्रश्न साहित्यातून प्रकर्षाने रेखाटलेले दिसून येतात. त्यांच्या कथा साहित्यातून याचे प्रत्येकाचे दर्शन घडते. कथासाहित्यातून ग्रामीण जीवनातील विविध सूक्ष्म घटकांचा वेध घेतांना स्त्रीजीवनाच्या सर्वंकष जीवनाचीही पार्श्वभूमी कथाकाराने उलगडून दाखविली आहे. शेती आणि स्त्री यांशी निगडित व्यापक घटकांचे जीवनदर्शन कथेतून प्रतीत केले आहे. प्रा. देवबा पाटील यांच्या " रूपगर्विता " आणि " उंबरा " या ग्रामीण कथासंग्रहातून स्त्री कृषीजीवन आणि त्या कृषीजीवनातील वास्तव वैविध्य ग्रामीण स्त्रीव्यक्तिरेखांच्या रुपातून प्रखरतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Files
5...pdf
Files
(477.5 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:90004aa374c3ca6441754dd0de45b4e0
|
477.5 kB | Preview Download |