Published October 20, 2023 | Version v1
Journal article Open

मराठी ग्रामीण कादंबरीतील कृषीजीवन

Description

प्रास्ताविक

            भारत हा खेडयापाड्यांचा व वाडयातांडयाचा देश आहे. आजही आपल्या देशातील ऐशी टक्के जनता ग्रामीण भागात राहते. बळीस्थान म्हणून महात्मा फुले भारताचा उल्लेख करतात. तर महात्मा गांधीनी खरा भारत खेडयापाडयांतून राहतो असे सांगितले आहे. कृषी व कृषकांची हीच खरी भारताची संस्कृती मानली जाते. कृषिकेंद्रितता हाच ग्रामीण व्यवस्थेचा पाया मानला जातो. ग्रामीण भागातून सर्वदूर पसरलेल्या समाजाची स्वतःची अशी एक संस्कृती निर्माण झालेली आहे. हा ग्रामसमाज स्थितीशील, स्वायत्त, स्वयंपूर्ण, रूढीग्रस्त आणि कमालीचा एकजिनसी असल्याचे दिसते. कुटुंबसंस्ंथा, जातीसंस्था, धर्मसंस्था, शेती व्यवसाय, नाते-गोते संबंध, श्रमविभागणी बारा बलुतेदारी, कारू नारूची व्यवस्था कार्यरत होती. नैसर्गिक आपत्तीमुळे एखादया वेळेस ही घडी क्वचित प्रंसगी विस्कटली जायची. यामध्ये रोगराई, दुष्काळ, अतिवृष्टी लढाया यामुळे थोडाफार बदल होई. परंतु कोणत्याही प्रकारे पारंपारिक मानसिकतेत बदल होऊ देत नव्हते. खेडयापाडयातून आज परिवर्तनाला प्रारंभ झाला आहे. ही गोष्ट खरी आहे. परंतु कितीही परिवर्तन झाले तरी कृषिकेद्रित रचना हे ग्रामसंस्कृतीचा प्रमुख घटक पूर्वीपासून राहिलेला आहे. तसेच ग्रामसंस्कृती आणि निसर्ग यांचा अतुट संबंध आहे. भारतीय शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. 

Files

4...pdf

Files (418.7 kB)

Name Size Download all
md5:9ed2d93499721ef22394bb23a8f30695
418.7 kB Preview Download