प्राथमिक आश्रमशाळा, परळी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, परळी यांचा तुलनात्मक अभ्यास
Creators
Description
गोषवारा :
देशाचा विकास हा त्या देशातील मनुष्यबळावर अवलंबून असतो. जेवढे मनुष्यबळ कौशल्याधिष्ठीत असते तेवढे त्या देशाच्या विकासास महत्त्वपूर्ण ठरते. असे मनुष्यबळ घडविण्यासाठी तसेच संस्कारक्षम नागरीक घडविण्याचे साधन म्हणजे शिक्षण होय. यासाठी शिक्षण देणाऱ्या प्रभावी शाळा या आजच्या काळाची गरज आहे. आजच्या शिक्षण पध्दतीमध्ये शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थी आणि शिक्षक यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील परळी येथील प्राथमिक आश्रमशाळा परळी आणि जिल्हा परिषद शाळा, परळी यांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. परळी परिसर हा आदिवासी विभागात मोडतो. या शाळांचा तुलनात्मक अभ्यास करतांना शाळांची विद्यार्थीसंख्या, भौतिक सोयीसुविधा, सरकारी योजना, इ. विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्या शाळांमधील भौतिक सुविधा आणि राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा आढावा घेता येईल. त्याचप्रमाणे त्यावर उपाययोजना सुचविता येतील.
Files
x1.pdf
Files
(489.1 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:c9f63e9ccca32b2c880947f82660e4ce
|
489.1 kB | Preview Download |