Published October 28, 2023 | Version v1
Journal article Open

महात्मा गांधी यांचे विचार : काल, आज आणि उद्या

  • 1. विभाग प्रमुख, इतिहास विभाग, श्री मधुकरराव बापुराव पाटील खतगांवकर महाविद्यालय शंकरनगर ता. बिलोली जि. नांदेड ४३१७२२ महाराष्ट्र, भारत

Description

महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसा या तत्वाचा अवलंब करुन बलाढय ब्रिटिश साम्राज्याविरुध्द भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशव्यापी लढा उभारला. या लढयामुळे ब्रिटिश साम्राज्य हादरुन गेले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी म.गांधीनी सनदशीर मार्गाने लढा देवून एक इतिहास निर्माण केला. इ.स.1920 साली म.गांधीचा काँग्रेसवर प्रभाव निर्माण झाला. त्यांनी केलेल्या कार्यामुळे गांधीयुग निर्माण झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात जे अनेक लहान थोर नेते होऊन गेले त्या सर्वांच्या तुलनेत म.गांधीचे व्यक्तिमत्व वैशिष्टयपुर्ण व लोकविलक्षण होते. हिंदू आणि ख्रिस्ती धर्म कल्पना, पौरात्य आणि पाश्चिमात्य सांस्कृतिक परंपरा आणि मध्ययुगीन व आधुनिक नीतिमुल्ये त्यांच्या जिवनात एकवटलेली दिसुन येतात. त्यांनी सर्वसामान्य जनतेचा नेहमीच विचार केलेला आहे. "मी असा एक भारत घडविण्याचा प्रयत्न करीन, ज्यात गरिबातल्या गरीब माणसाला हा देश त्यांचा स्वत:चा आहे असे वाटेल."1 म.गांधी यांच्या या विचारामुळेच सर्वसामान्य जनता म.गांधीनी स्वातंत्र्यासाठी चालविलेल्या चळवळीत मोठ्या प्रमाणात सामील झाली.

मा.गांधी इ.स.1893 ते 1914 असा एकूण एकविस वर्षाचा काळ दक्षिण अफ्रिकेत व्यतीत केला. 9 जानेवारी 1915 साली ते भारतात आले. दक्षिण अफ्रिकेतून ते अधूनमधून भारतात येत राहिले. दक्षिण अफिक्रेत वर्णवाद मोठया प्रमाणात होता. म.गांधींनाही दक्षिण अफ्रिकेत अनेकवेळा अपमान सहन करावा लागला. वर्णभेदाविरुध्द त्यांनी तेथे चळवळ चालवली. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचा मृत्यु झाल्यानंतर काँग्रेसवर म.गांधी यांचा प्रभाव निर्माण झाला. ते मवाळवादी विचारसरणीचे असल्यामुळे त्यांनी सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करुन जुलमी ब्रिटिश सरकार विरोधात  लढा चालवला. असहकार चळवळ व सविनय कायदेभंग या चळवळी सनदशीर मार्गान चालवल्या. स्वातंत्र्याची चळवळ चालवत असतांनाच म.गांधीनी अस्पृश्यता निवारण, हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सुधारणा इत्यादी कार्य केले. सुरुवातीला कट्टर चातुर्वर्ण्यवादी विचारांचे असलेल्या म.गांधीच्या विचारात नंतर अमुलाग्र बदल होवून त्यांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. या सर्व बाबीचा विचार केला तर दिसून येईल की, म.गांधीचे विचार काल, आज आणि उद्यासाठी उपयुक्त आहेत.

Files

2023010410011007232.pdf

Files (892.8 kB)

Name Size Download all
md5:0c88a963a252355c7c1e5a5ccfc4706d
892.8 kB Preview Download