Published October 28, 2023 | Version v1
Journal article Open

महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचे तत्वज्ञान

  • 1. विभाग प्रमुख, इतिहास विभाग, शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव ४१३५२८ महाराष्ट्र, भारत

Description

महात्मा गांधींच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात सत्य व अहिंसा या तत्वास बहुमोल असे महत्व आहे. त्यांचे संपूर्ण राजकीय तत्वज्ञान याच तत्वावर आधारलेले आहे त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील चळवळीत जे सत्याग्रहाचे अस्त्र उदयास आले त्या अस्त्राची प्रेरणाही याच दोन तत्वामधून तयार झाली होती. म. गांधींचे सत्याग्रहाचे अहिंसात्मक तत्त्वज्ञान त्यांच्याच शब्दात समजून घेणे अधिक उचित ठरेल. गांधीजींनी आपल्या अनुयायांना अन्यायाशी व जुलमाशी अहिंसात्मक प्रतिकार करावयास शिकवले. पण ही अहिंसा भ्याड माणसाची नव्हती. जो निर्भय असतो, तो शूर असतो त्यासच ही अहिंसा आचरता येते. गांधीजी म्हणतात, "अहिंसा हा भ्याडाचा किंवा नेभळटपणाचा मार्ग नव्हे. मृत्यूला सामोरे जाणाऱ्या शूरांचा तो मार्ग आहे. हाती शस्त्रे घेऊन जो मृत्युमुखी पडतो, तो निसंशय शूर आहे‌. परंतु जरा देखील कच न खाता किंवा बोटे देखील न उचलता जो मृत्यूला सामोरा जातो, तो अधिक शूर म्हटला पाहिजे. तुम्ही नामर्दपणावर अहिंसेचे अस्तर चढविण्यापेक्षा, तुमच्या मनात जर काही खरोखरच हिंसा धगधगत असेल तर अहिंसेचे आचरण करणे अधिक चांगले असे मी बिनदिक्कत सांगेन. नामर्द पणापेक्षा हिंसा केव्हाही श्रेयसकर."1आणखीन पुढे जाऊन गांधीजी म्हणतात " माझा विचार हे अहिंसेवरिल अखेरचे भाष्य समजू नका. मला स्वतःच्या मर्यादांची जाणीव आहे. स्वतःचा शोध करणारा मी एक नम्रपाईक आहे. माझ्या प्रत्येक प्रयोगामुळे आयुष्य वरील माझी श्रद्धा अधिक द्रढमूल झाली आहे. अहिंसा ही मानव जातीला उपयुक्त अशी एक सर्वश्रेष्ठ शक्ती आहे‌. तिचा उपयोग व्यक्ती पुरताच मर्यादित नाही; तिचा प्रयोग समुदायाला देखील करता येईल अशी माझी दृढ श्रद्धा आहे."2

Files

20230104767771185.pdf

Files (699.0 kB)

Name Size Download all
md5:25b0b8a3f561c998df318b08dfc6fea6
699.0 kB Preview Download