महात्मा गांधीजींची रामराज्य संकल्पना
- 1. श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला महाविद्यालय, लातूर ४१३५३१ महाराष्ट्र, भारत
Description
'भगवदगितेला' मार्गदर्शक मानणारे महात्मा गांधीजी अतिशय धार्मिक व संस्कारक्षम वातावरणात वाढले. गीतेचा गांधीजींवर फार मोठा प्रभाव होता. 'परस्त्रीला मातेसमान वागणूक' 'फळाची अपेक्षा न ठरता काम करत रहा,' या वचनाने ते अत्यंत प्रभावित झाले. गांधींना माणसांमधील नैतीकता हवी होती. धार्मिक, नैतीक आणि संयमीत जीवन जगत असताना गांधीजीनी आपल्याला अनेक गोष्टींची शिकवन दिली. गांधींचा धर्मविचार हा व्यवहारिक, वास्तववादी होता. म्हणजे धर्मातून समाजाचे दैनंदिन प्रश्न सुटायला हवेत असे त्यांचे मत होते. धर्माचे कोणतेही तत्व विवेकाच्या विरोधात जाणारे असेल किेंवा नैतिकतेशी संघर्ष करणारे असेल तर या तत्वाला गांधीजींचा नकार होता. गांधीजी सर्वधर्मसमभाव मानणारे होते. त्यांची सार्वत्रीक धर्मावर, वैश्वीक धर्मावर श्रध्दा होती. सर्व धर्मांच्या श्रध्दा, शिकवण यांचा गांधी आदर करीत असत.
समाजातील अस्पृश्यता मूळासकट उखडून टाकली पाहिजे असे गांधीजींचे मत होते. त्यांना जातींच्या आधारावर भेदभाव मान्य नव्हता. वेगवेगळ्या जातींचे लोक एकत्र आले की आदर्श समाज प्रस्थापीत होईल असे त्यांना वाटत होते. सर्वोदय म्हणजे सर्व समाज घटकांचा विकास हे त्यांचे ध्येय होते. गांधीजींनी स्त्री-पुरुष समानतेला मान्यता दिली. त्यांचे असे मत होते की, स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक भेद हा श्रेष्ठ -कनिष्ठता दर्शवित नाही तर कर्तव्यांमधील वेगळेपण व्यक्त करतात. त्यांचा स्त्रियांना असा सल्ला होता की त्यांनी गुलामगिरी वृत्ती सोडून देऊन पुरुषांच्या बरोबरीने काम केले पाहिजे आणि मानवी विकासाला हातभार लावला पाहिजे. अहिंसा प्रस्थापीत करण्यात स्त्रियाच मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकतात असे त्यांचे मत होते.
गांधीजींचे सत्य व अहिंसा, सत्याग्रह, सर्वोदय संकल्पना, ग्रामस्वराज्य, विश्वस्त सकंल्पना स्वराज्य, स्वातंत्र्य, लोकशाही गांधीची रामराज्याची कल्पना धार्मीक व सामाजिक विचार, स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्य्ता निवारण, खादी आणि स्वदेशी संबंधी विचार, नैतीक आचरणासंबंधी विचार, धर्म आणि भगवद्गितेविषयी असलेली त्यांची श्रध्दा या आणि अशा अनेक महत्वाच्या पैलूंवर महात्मा गांधीजींनी आपले मौलीक विचार मांडलेले आहेत. आपले संपूर्ण जिवन समाजासाठी, राष्ट्रासाठी अर्पण करणारे महात्मा गांधी खऱ्या अर्थाने महात्मा आहेत. प्रत्येक व्यक्तीचे समाजातील अस्तित्व कसे असावे यापासून ते एक आदर्श राज्य म्हणजेच रामराज्याची संकल्पना त्यांनी मांडली आणि याच माध्यमातून त्यांनी त्यांचे एक आदर्श जिवनच आपल्यासमोर ठेवले आहे.
Files
20230104607612151.pdf
Files
(648.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:45c940f0eb295dc5cfa71552186f3152
|
648.2 kB | Preview Download |