गांधीजींचे शिक्षणविषयक विचार : काल आणि आज
Authors/Creators
- 1. श्री. पद्ममणि जैन कला व वाणिज्य महाविद्यालय, पाबळ ता. शिरूर, जि. पुणे ४१२४०३ महाराष्ट्र, भारत
Description
भारतात शिक्षण कशा पद्धतीचे असावे यावर ब्रिटीश काळापासून आत्तापर्यंत अनेक आयोग नेमले गेले. त्यांच्या शिफारशी अंमलात आणल्या गेल्या. विविध प्रयोग केले गेले, केले जात आहेत. अनेक विचारवंत व अभ्यासक यांनी आपापली मते यासंबंधी मांडली. याच व्यक्तिमत्वांपैकी एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी होय. महात्मा गांधीजी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा चालू असल्यापासूनच सर्वच क्षेत्रात वेगळ्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला. याच प्रकारे त्यांनी शिक्षण व्यवस्थेसंबंधीही आपले विचार मांडले. ते केवळ विचार मांडूनच थांबले नाहीत तर त्यासंबंधी स्वत: कृती करून अंमलातही आणले. आणि त्यांचा एक रचनाबंध तयार केला. त्यांनी मांडलेले हे विचार डर्बन येथील आश्रम शाळेत तसेच वर्धा येथील शाळेत त्यांनी अंमलात आणलेले दिसतात. गांधीजींची शिक्षण योजना 'वर्धा योजना', किंवा 'मूलगामी शिक्षण' या नावाने ओळखली जाते. 'नयी तालीम' या नावानेही ती ओळखले जाते. त्यांनी व्यवहारिक शिक्षणावर, भर दिला. एखादा उद्योग, त्याची कौशल्ये, त्याचे शास्त्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा नई तालीमचा उद्देश होता. शिक्षण हे साध्य नसून ते एक साधन आहे असे गांधीजींचे मत होते. शिक्षण हे मानवी जीवनाची जडणघडण करण्याचे शास्त्र आहे, कलाही आहे. म्हणून शिक्षणातून व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास झाला पाहिजे.
Files
20230104496500129.pdf
Files
(925.8 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:79f4a8bee07572d215cb10565843e4e9
|
925.8 kB | Preview Download |