महात्मा गांधीजीचे ग्राम स्वराज्य व ग्रामविकास संदर्भात विचार
Creators
- 1. सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, श्री. साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय, वडनेर ता. हिंगणघाट, जि. वर्धा ४४२३०७ महाराष्ट्र, भारत
Description
महात्मा गांधीजीची ग्रामस्वराज्य व ग्रामविकासाची संकल्पना अभ्यासल्यास असे दिसून येते कि, ग्रामीण विकासाच्या संदर्भात त्यांनी अतिशय समर्पक भूमिका मांडली आहे. ग्रामीण भागामध्ये परंपरागत व्यवसायाची आवश्यकता नैसर्गिक व मानवीय संसाधना योग्य उपयोग करणे गरजेचे आहे. गांधीजीनी ग्रामीण विकासाबाबत संकल्पना म्हणजे भारतीय ग्रामीण समाजाच्या गरजा भागविण्याचे आणि ग्रामीण भागात रोजगार तथा समृद्धी निर्माण करण्याचे आचार प्रधान तत्वज्ञान आहे. गांधीजीचे तत्वज्ञान आपल्या देशाच्या पुरातन व्यवसायावर तथा परंपरेवर आधारित असले तरी ते पूर्णपणे परंपरावादी नाहीत उलट परिवर्तनशील व प्रगतीवादी आहे. ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, गावातील वादविवाद, तंटे सोडविण्यासाठी तंटामुक्ती समिती, निर्माण करणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे गांधीजीच्या वरील संकल्पनेचा विचार होणे आवश्यक आहे. ग्रामविकासाकरीता वर्तमानकाळातील जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरनाच्या नव्या युगात गांधीजीच्या विचाराची त्यांच्या संकल्पनेची नितांत आवश्यकता आहे.
Files
20230104262268083.pdf
Files
(791.2 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:25be355da90e36e4493551b8982beef7
|
791.2 kB | Preview Download |