महात्मा गांधी यांचे शैक्षणिक विचार
- 1. विभाग प्रमुख, इतिहास विभाग (UG & PG), वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी, नांदेड ४३१६०६ महाराष्ट्र, भारत
Description
अहिंसेच्या तत्त्वज्ञानातून आचार, विचार, आणि प्रत्यक्ष कृतीमधून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे युगपुरुष म्हणजे महात्मा गांधी हे होत. देशाची प्रगती साधायची असेल तर त्या प्रगतीचा आत्मा म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी आपले शिक्षण विषयक उच्च विचार मांडले. अहिंसेचे पुजारी हातात शस्त्र न घेता निक्षत्रपणे लढून स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र सैनिक, समाज सुधारक, तत्त्वचिंतक, राष्ट्रपिता व शिक्षणतज्ञ अशा विविध जबाबदाऱ्या पेलताना त्यांनी आपल्या विचारातून व प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाचे माध्यम, शिक्षणाची उद्दिष्टे, प्रौढशिक्षण विषयक मत, शिक्षक व विद्यार्थी यांचे कर्तव्य, स्त्री शिक्षण, स्वावलंबन, शारीरिक शिक्षण, नैतिकता, प्रामाणिकपणा, धर्मनिरपेक्ष शिक्षण, लैंगिक शिक्षण, आणि नई तालीम अथवा वर्धा शिक्षण याविषयी आपले विचार मांडले. सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण हे दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरते शोषण - विरहित समाजाची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती. अहिंसक, न्यायपूर्ण, समता व सहकार्य आधारित समाज संस्कृतीची निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथे 'नई तालीम' या अभिनव शिक्षण पद्धतीची सुरुवात केली होती त्यांचे शिक्षण विषयक विचार पुढील प्रमाणे.
Files
2023010595100049_c.pdf
Files
(234.4 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:f3bd3b285f995778047c662f4cf0dabd
|
234.4 kB | Preview Download |