महात्मा गांधीजींचे आर्थिक व सामाजिक विचार
- 1. विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, शिवाजी महाविद्यालय,रेनापूर ४१३५२७ महाराष्ट्र, भारत
Description
स्वतंत्र भारताच्या इतिहासात महात्मा गांधींचे नाव सुवर्ण अक्षराने लिहावे इतके महत्त्वाचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींचे योगदान महत्त्वाचे आहे.याचा विसर भारतीयांना पडता कामा नये.जीवन जगत असताना सामाजिक,आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचा जो मार्ग गांधीजींनी समाजाला दाखविला.त्यामुळे ते भारतातच नव्हे तर जगामध्ये अजरामर झाले.स्वतंत्र भारताच्या विकासासाठी महात्मा गांधींनी जे आर्थिक विचार मांडले ते वर्तमान स्थितीत सुद्धा खरे वाटतात.गांधीजींनी राजकीय विकेंद्रीकरणाबरोबर आर्थिक विकेंद्रीकरणावर भर दिला आहे.देशाच्या विकासासाठी त्यांनी नेहमी आर्थिक समतेचा विचार केला.गांधीजींना नेहमी वाटत होते नैतिक विचारांचा प्रभाव आर्थिक जीवनावर असायला हवा.महात्मा गांधीजींनी ज्या विचारांचा आग्रह धरला,जे वास्तवामध्ये त्यांनी प्रत्यक्षामध्ये जीवन जगले व त्यांनी मार्गदर्शन केले ते आजच्या जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाच्या काळात अत्यंत मोलाची वाटतात.महात्मा गांधी यांचे विचार काल,आज आणि उद्यासाठी जगाला मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही. म्हणून महात्मा गांधी म्हणतात मला असा भारत निर्माण करावयाचा आहे.गरीबातील गरीब माणसाला हा आपला देश आहे व त्याची जडणघडण करण्यामध्ये आपला वाटा आहे असे वाटेल. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क प्राप्त होतील.जाती-जातीचे, धर्मा-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतील. देशां- देशामध्ये स्नेहाचे संबंध असतील.अशा पद्धतीने माझे सुंदर भारताचे स्वप्न आहे.
21 व्या शतकाला विकासाचे शतक महणून ओळखले जाते.महात्मा गांधींचे शशक्त भारताचे स्वप्न खरे करावयाचे असेल तर या देशाचा शाश्वत विकास झाला पाहिजे. पण शाश्वत विकास कोणता आहे हे कोणालाही माहित नाही. विकासाच्या स्पर्धेत भारत देश सुद्धा सामील झाला आहे. पण भारताचा खरा विकास कोणता याबद्दल अनभिज्ञता आढळून येते. गांधीजींच्या विचारानुसार ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. खेड्याच्या विकासाबरोबर शहराचा विकास होऊ शकतो हे वास्तव असताना आज आपण पाहतो शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर होतो. परंतु खेड्याचा विकास झालेला दिसून येत नाही.म्हणून खरी गरज शायनिंग व्हिलेजची आहे.म्हणून महात्मा गांधीच्या सामाजिक व आर्थिक विचारांची गरज देशाला आहे.गांधीजी म्हणतात,'भारताचा आत्मा हा खेड्यात आहे'.त्यामुळे खेड्याचा विकास म्हणजे देशाच्या आत्म्याचा विकास होय.
आज जगासमोर व भारत देशासमोर अनेक प्रश्न आहेत. भारताबरोबरच संपूर्ण विश्व विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे.आधुनिक भारतासमोर आजही अनेक प्रश्न आहेत.ज्याचे उत्तर निश्चित गांधी विचारांच्या माध्यमाने सापडू शकेल. महात्मा गांधीनी असे म्हटले होते की, देशाला आदर्श बनविण्यासाठी राजकारणाला धर्माची जोड देणे आवश्यक आहे.परंतु कोणता धर्म त्यांच्या दृष्टीने अपेक्षित होता? तर मानव धर्म व नैतिकता याची झालर राजकारणाला असेल तर देशातील जनतेला चारित्र्यवान बनवून देशाला सुद्धा चारित्र्यवान बनविता येईल.
भारत एकीकडे महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतो आहे. परंतु भारताची दुसरी बाजू पाहिली तर आजही अन्न,वस्त्र,निवारा, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करता आलेल्या नाहीत. आजही देशात सुशिक्षितांचे प्रमाण कमी आहे. भारतासमोर दारिद्र्य,बेकारी,आर्थिक विषमता, भ्रष्टाचार,देशातील गुन्हेगारी,स्त्रियांना सन्मानाची वागणूक केव्हा मिळेल? शेतकऱ्याच्या आत्महत्या कशा रोखता येतील? या सर्व समस्या वर मात करावयाची असेल तर त्याचे मूळ उत्तर गांधी विचारात दडलेले आहे. गांधींनी म्हटले होते की, भारत हा खेड्याचा देश आहे, खरा भारत देश पाहावयाचा असेल तर खेड्याकडे चला असे आव्हान गांधीजींनी केले होते. त्यांच्या मते वरील समस्यावर मात करावयाची असेल तर, देशाच्या नेतृत्वाला प्रथम ग्रामीण विकास घडवून आणणे महत्त्वाचे आहे.म्हणून देशाचा शाश्वत विकास करावयाचा असेल तर महात्मा गांधी यांचे विचार काल आज व भविष्यामध्ये कसे महत्त्वाचे आहेत या अनुषंगाने गांधीजींचे सामाजिक व आर्थिक विचारांची देशालाच नव्हे तर जगाला आवश्यकता आहे हेच या शोधनिबंधातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Files
202301058894048_c.pdf
Files
(212.4 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:08e9f72e5205c7197ef943d3c445f6b0
|
212.4 kB | Preview Download |