पर्यटनातील इतिहासाचे स्थान
Creators
- 1. इतिहास विभाग, जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर, जिल्हा: लातूर, महाराष्ट्र, भारत
Description
पर्यटनातील इतिहासाचे स्थान
डॉ. प्रमोद लक्ष्मणराव चव्हाण
इतिहास विभाग, जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर, जिल्हा: लातूर, महाराष्ट्र, भारत
Received: 21 March, 2023 | Accepted: 23 March, 2023 | Published: 25 March, 2023
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनुष्याचा स्वभाव निसर्गता भ्रमणशील आहे. तो सतत नवीन अनुभूती घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याची ही जिज्ञासू प्रवृत्ती त्याच्या प्रगतीचे मूळ कारण ठरते. आपल्या मनातील जिज्ञासा शांत करण्यासाठी मानव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. या प्रक्रियेला प्राचीन काळात देशाटन किंवा पर्यटन असे म्हटले जात होते.१ हे पर्यटन प्राचीन काळी अतिशय कष्टप्रद होते. बैलगाडी, उंट, घोडा, खेचराच्या साह्याने जंगल, नदी अथवा डोंगर पर्वत पार करून जाणे अतिशय कठीण होते. तथापि आधुनिक काळात प्रवास करणे एक सुखद अनुभव बनला आहे. मोटर, स्कूटर, बस, विमान व समुद्र जहाजाच्य सह्याने आपण पर्यटनाची सहल पूर्ण करू शकतो. पर्यटनामुळे. नव नवीन लोकांना भेटून त्यांचे खाण-पान त्यांची वेशभूषा, केशभूषा, संस्कृती आदींचा परिचय प्राप्त करून घेऊ शकतो.२ त्यामुळे आपले मनोरंजन होऊन ज्ञानात वाढ होते. दळणवळणाच्या साधनांतील क्रांतिकारी बदलामुळे पर्यटन हा एक बिनभांडवली उद्योग म्हणून उदयास आला आहे.
प्राचीन काळातील मानव अजानतेपणाने प्रवास करत असला तरी, आजचा मानव मात्र आवड, कुतूहल व संशोधक म्हणून प्रवास करतो. पर्यटनामुळे प्रत्येक देशाला परकीय चलन मिळते.३ भिन्न समाजातील, देशातील लोकांचा संपर्क पर्यटनामुळे निर्माण होतो. राष्ट्रीय एकात्मतेसोबतच वैश्विक स्तरावर बंधुभाव जोपासण्याचे कार्य पर्यटनामुळे होते.
पर्यटन उद्योगात इतिहासाचे स्थान अनन्यसाधारण आहे. संपूर्ण जगभरातील ऐतिहासिक पर्यटन हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार मानला जातो. लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते. इतिहासातील घटना स्थळाला भेट देण्याची इच्छा पर्यटकांच्या मनात असते. त्यामुळेच पर्यटनाच्या अनेक प्रकारात ऐतिहासिक पर्यटन प्रकाराचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणार्या किल्ल्यावर दुर्ग अभ्यासक दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करताना दिसतात. भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित स्थळे, अशा ऐतिहासिक ठिकाणाच्या सहली सर्वांच्या आवडीचा विषय ठरतात.
भारत हा एक प्राचीन देश असून त्याला फार मोठा गौरवशाली इतिहास प्राप्त झाला आहे. भारतातील या ऐतिहासिक स्थळांना पाहण्यासाठी देशातीलच नाही तर परदेशातूनही लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात. विशेषता अभ्यासाच्य हेतूनें शिक्षण संस्था व अभ्यास केंद्राद्वारे अशी पर्यटने आयोजित केले ज़ातात. भारतामध्ये ऐतिहासिक ठिकाणे भरपूर असल्याने या पर्यटनाला विशेष महत्त्व दिले जाते. यामध्ये किल्ले, स्मारके, ऐतिहासिक वास्तु, शिल्प, चित्रसंग्रहालय यांचा समावेश होतो. भारतातील आग्रा येथील ताजमहल, दिल्लीचा लाल किल्ला, महाराष्ट्रातील वेरूळ-अजिंठाची लेणी, मध्य प्रदेशातील खजुराहो, सांचीचा स्तूप अशा उपलब्ध असलेल्या अनेक ऐतिहासिक स्थळांना हज़ारो पर्यटक भेटी देतात४ त्यामुळे पर्यटनात इतिहासाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. अश्या या ऐतिहासिक स्थळाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.
महत्वाचे शब्द: पर्यटन, पर्यटनातील इतिहासाचे स्थान, इतिहास, किल्ले, लेणी, स्मारके, ऐतिहासिक राजधानी व शहरे, युद्धभूमी
किल्ले
प्राचीन काळापासून भारताच्या राजकारणात व राज्यकारभारात गड आणि किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. राजघराण्यातील संघर्ष आणि सत्तांतर याची साक्ष किल्ले आजही देताना दिसतात. म्हणून या किल्ल्याविषयीचे कुतूहल आज पर्यटकांच्या मनात वाटत असते. त्यामुळे किल्ले पर्यटन व्यवसायात अतिशय मोलाची भूमिका बजावू शकतात. पर्यटन स्थळ म्हणून:
- देवगिरी/दौलताबाद ता., जिल्हा औरंगाबाद
- शिवनेरी किल्ला ता. जुन्नर जिल्हा, पुणे
- अहमदनगरचा किल्ला जिल्हा अहमदनगर
- अजिंक्यतारा किल्ला, जिल्हा सातारा
- अर्नाळा किल्ला, वसई
- कंधारचा किल्ला ता.कंधार जिल्हा नांदेड
- प्रतापगड महाबळेश्वर, सातारा
- पुरंदर किल्ला. ता. पुरंदर जिल्हा, पुणे
- सिंधुदुर्ग, मालवण जिल्हा सिंधुदुर्ग
- रायगड ता. महाड जिल्हा, रायगड
- सिंहगड जिल्हा, पुणे
- प्रतापगढ जिल्हा, सातारा
- नळदुर्ग तालुका, तुळजापूर जिल्हा, उस्मानाबाद
- किल्ले परांडा, ता. परांडा, जिल्हा उस्मानाबाद
- किल्ले औसा. ता. औसा जिल्हा लातूर
- किल्ले उदगीर ता., उदगीर जिल्हा, लातूर
- महादुर्ग ता. किल्ले धारूर जिल्हा बीड
- पन्हाळा ता. जिल्हा, कोल्हापूर
- जंजिरा, मुरुड
- माहूरगड ता., माहूर जिल्हा, नांदेड.५
लेणी
भारतातील. एकूण लेण्यांपैकी. ८० टक्के लेण्या महाराष्ट्रात आहेत. या लेण्याचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्या धार्मिक वास्तू आहेत. महाराष्ट्रातील या लेण्यांपैकी सर्वात जास्त बौद्धधर्मीयांसाठी कोरलेल्या आहेत. त्यात चैत्यगृह. आणि विहार यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या लेण्या विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. विशेषता: वेरूळ-अजिंठाच्या लेण्या या जागतिक वारसास्थळे. म्हणून. जगप्रसिद्ध आहेत.६ त्यामुळे येथे दररोज हजारो पर्यटक येतात, आणि ऐतिहासिक लेण्यांचे विलोभनीय दर्शन घेतात.
- अजिंठा लेणी तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद
- वेरूळची लेणी तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद
- घटोत्कच लेणी तालुका सोयगाव, जि. औरंगाबाद
- शिरूर लेणी तालुका हदगाव जिल्हा नांदेड
- उस्मानाबाद लेणी तालुका जिल्हा, उस्मानाबाद
- भाजे लेणी तालुका वडगाव जिल्हा, पुणे
- कारले लेणी तालुका वडगाव, जिल्हा, पुणे
- जुन्नर लेणी तालुका जुन्नर जिल्हा, पुणे
- खरोसा लेणी तालुका औसा जिल्हा, लातूर
- बाराबार लेणी जिल्हा. गया. राज्य, बिहार
- खंडगिरी लेणी जिल्हा, भुवनेश्वर. राज्य ओरिसा
अशा प्रकारे या लेण्या चैत्यगृह आणि विहार यांच्या रूपात या परिसरातील सांस्कृतिक इतिहास सांगताना दिसतात. इ.सनाच्या सहाव्या शतकापासून या लेण्या निर्माण झाल्याचे पुरावे साहित्यातून व उत्खननातून स्पष्ट होते.७ आशा या स्थळांना भेटी देण्यासाठी विविध धर्मातील लोक येतात. त्यामुळे लेण्यासुद्धा पर्यटन व्यवसायात महत्त्वाची भूमिका निभावताना दिसून येतात असे स्पष्ट होते.
स्मारके
एखाद्या व्यक्तीचा अथवा घटनेच्या स्मरणार्थ निर्माण केलेली वास्तूस, स्मारक म्हणून ओळखले जाते. भारत अशा ऐतिहासिक स्मारकासाठी प्रसिद्ध देश आहे. देशात आतापर्यंत. ३६८६ स्मारकांना पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. आजही ही स्मारके पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या देखरेखीखाली ठेवले आहे.
- ताजमहल: मोगल बादशाह शाहजहानने आपली पत्नी मुमताज बेगमची आठवण म्हणून सन १६३१ साली आग्रा शहरात यमुना नदीच्या काठावर. हा महाल बनवला आहे.८
- कुतुबमिनार: कुतुबुद्दीन एबक यांनी १२ व्या शतकात दिल्ली येथे कुतुब मिनार बांधायला सुरुवात केली. पण तो अल्तमशने पूर्ण केला. बगदाद येथील सुफी संत कुतुबुद्दीन बख्तियार काकीची आठवण म्हणून हा कुतुब मिनार उभारला.
- इंडिया गेट: नवी दिल्ली येथे इंडिया गेट नावाचे प्रसिद्ध स्मारक आहे. १९३१ साली ४२ मीटर उंचीचे हे इंडिया गेट. ९०,००० ब्रिटिश भारतीय सैन्याच्या स्मरणार्थ बांधले आहे.
- हवामहाल: राजस्थानात जयपूर येथे हवा महाल नावाची वास्तु सन. १७९९ साली महाराजा सवाई प्रतापसिंह द्वारा निर्माण केली.
- चारमिनार: हैद्राबाद येथे कुली कुतुबशाहद्वारा चार मिनार नावाची वास्तु उभारली.
अशा प्रकारे स्मारक जतन करून पर्यटन विभाग पर्यटकांना आकर्षित करण्याचे काम पर्यटन विभाग करत असतो.
ऐतिहासिक राजधानी व शहरे
आपल्या देशात अथवा महाराष्ट्रात ऐतिहासिक राजधानी व शहरे फार मोठ्या प्रमाणात आहेत. आजही त्या शहरात इतिहासाच्या पाऊलखुणा आपणास दिसून येतात. देशात दिल्ली, अजमेर, जयपुर, जोधपुर, ग्वाल्हेर, कलकत्ता, मद्रास. तर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, दौलताबाद, औरंगाबाद, नाशिक, कंधार, पैठण, भोकरदन. नांदेड ते धर्मापुरी अनेक शहरे व राजधानी पर्यटकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरतात. बीबी का मकबरा, पवनचक्की. बावन पेठांचे शहर म्हणून औरंगाबादला ओळखले जाते. याशिवाय औरंगाबादजवळ वेरुळ, अजिंठा दौलताबादही जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे पर्यटकांना साद देतात. पैठण, लातूर, कंधार, परांडा, उदगीर, नळदुर्ग, औसा, बीड, अंबाजोगाई, उस्मानाबाद, तेर, भोकरदन आदि ऐतिहासिक स्थळांना हजारो पर्यटक सातत्याने भेटी देताना दिसतात. दिल्ली स्थित गांधीजींचे समाधीस्थळ राजघाट, नेहरू यांचे समाधीस्थळ शांति घाट, लाल बहादुर शास्त्रीचे समाधीस्थळ, विजय घाट आदि पाहण्याचे पर्यटकांच्या मनात आकर्षण असते.९
युद्धभूमी
इतिहासातील राजे-महाराजे सत्ताप्राप्तीसाठी अथवा साम्राज्य विस्तारासाठी सतत युद्ध करीत. ज्या ठिकाणी हे युद्ध होत होते त्या ठिकाणास युद्धभूमि असे म्हणतात. अशी युद्ध स्थळे पाहण्याचे एक आकर्षण लोकांच्या मनात असते.
- महाभारत काळात जेथे कौरव पांडव युद्ध झाले ती भूमी कुरुक्षेत्र
- महाराणा प्रताप व अकबर यांच्यातील युद्धभूमि हल्दीघाट
- मराठे व अब्दाली यांच्यातील युद्धभूमि पानीपत
- इंग्रजांची भारतातील पहिले युद्ध झालेली भूमी प्लासी त्यानंतर बक्सार
- भारत-पाक युद्धभूमि कारगिल
- मराठे-निजाम यांची युद्ध भूमी उदगीर, राक्षसभुवन
असे कितीतरी युद्ध स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे हजारो देशविदेशातील पर्यटक या युद्धभूमीला भेट देतात.
एकंदरीत ऐतिहासिक वास्तु आणि इतिहास हा पर्यटनाचा प्रमुख आधार समजला जातो. कारण ऐतिहासिक किल्ले, लेणी, स्मारक, युद्ध भूमी, ऐतिहासिक राजधानी, ऐतिहासिक शहर इत्यादी घटक पर्यटकासाठी. कायम आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरले आहेत. त्याच्यावरच ऐतिहासिक पर्यटन अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटनात इतिहासाची भूमिका महत्त्वाची ठरते.
संदर्भग्रंथ सूची
- डॉ. विठ्ठल घारपुरे, पर्यटन भूगोल, पिंपळापुरे एंड. कंपनी पब्लिशर्स, नागपुर, २०१०, पृष्ठ ०२
- कित्ता, पृष्ठ ०२
- डॉ. सुशीलकुमार छिल्लर, भारत में पर्यटन का विकास व संभावनाएँ. राहुल पब्लिशिंग हाउस. शास्त्री नगर, मेरठ २०१३, पृष्ठ ६५
- डॉ. प्रमोद चव्हाण, उदयोन्मुख प्रवाह पर्यटन, संकल्प प्रकाशन, लातूर. २०१७, पृष्ठ २४
- कित्ता, पृष्ठ २४
- अनुपम पांडे पर्यटन कां स्वरूप डिस्कव्हरी पब्लिशिंग हाउस नवी दिल्ली. २००७, पृष्ठ ११९
- डॉ. विठ्ठल घारपुरे, पर्यटन भूगोल, पिंपळापुरे एंड. कंपनी पब्लिशर्स, नागपुर, २०१०, पृष्ठ १२५
- डॉ. सुरेशचंद्र बंसल, पर्यटन भूगोल व यात्रा प्रबंधन, मीनाक्षी प्रकाशन, मेरठ, २०११, पृष्ठ २२
- डॉ. प्रमोद चव्हाण, उदयोन्मुख प्रवाह पर्यटन, संकल्प प्रकाशन, लातूर. २०१७, पृष्ठ २५
- कित्ता, पृष्ठ २४
Files
202301012327006_c.pdf
Files
(184.6 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:345111b002192c46984380c88cd2cf96
|
184.6 kB | Preview Download |