Published September 6, 2022 | Version v1
Journal article Open

नाविन्यपूर्ण अध्ययन-अध्यापन कार्यानिती

  • 1. Professor,Research Guide शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, एस.पी.एस.कॉलेज ऑफ एज्यूकेशन, सांगली Asst.Professor, पी.एच.डी. संशोधक (Education), शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

Description

प्रस्तावना

२१ व्या शतकात अध्ययन अध्यापन प्रक्रियेत भरपूर बदल होत गेले ही प्रक्रिया शिक्षक केंद्रित न राहता विध्यार्थी केंद्रित व्हावी अशी अपेक्षा सर्वच थरातून होऊ लागली,२००५ पासून ज्ञान राचानावादाचे वारे शैक्षणिक क्षेत्रात वाहू लागले. विध्यार्थी केंद्रित शिक्षण ही संकल्पना तशी प्राचीन अगदी उपनिषद, सोक्रेटीस काळापासून दिसून येते.आज इंटरनेट ,संगणक, मोबाईल यांचा प्रभाव शिक्षणक्षेत्रात वाढला.या सगळ्या गोष्टीमुळे अध्ययन-अध्यापनाची तंत्रे ,कार्यानिती,पद्धती यामध्येही बदल झाले. पाठ्यपुस्तक बदलली त्यामुळे आधुनिक कार्यानितींच्या वापराची गरज निर्माण झाली. सध्या शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे .अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसाठी नवनवीन बाबी समजणे गरजेचे आहे.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकात म्हंटलेले आहे “ज्ञानाचा,कौशल्याचा सतत वापर करत राहिले पाहिजे तर संकल्पना सुचत राहतात आणि नवनिर्माण होते. जितके आपण आपल्या कुवतीचा वापर करत राहतो तेवढ्या त्याच्या कक्षा रुंदावत जातात. व्यक्तिमत्वाच्या विविध पातळीवर आपली गुणवत्ता वाढत फुलत जाते. त्यातूनच दृष्टीकोण वैशिष्ट्ये मूल्ये स्वभाव तयार होत राहतात.” आणि या बाबी साठी आधुनिक कार्यानितीची संकल्पना महत्वाची आहे.प्रस्तुत लेखनामध्ये तात्काळ अध्यापन कार्यानितील शोध घेण्यात आलेला आहे.

Files

3..pdf

Files (579.2 kB)

Name Size Download all
md5:64eeb2ee138664179011b0724fe87659
579.2 kB Preview Download