COVID -१९ दरम्यान ताण व्यवस्थापन
Description
अचानक पणे उद्भवलेल्या साथीच्या आजाराने पूर्ण जगावर परिणाम झाला. मनुष्य प्राण्याचे पूर्ण आयुष्यमान बदलून गेले. व्यवसायिक, नोकरदार वर्ग सर्वांवरच विपरीत परिणाम झाला. त्यामध्ये शिक्षण प्रक्रिया ही ऑनलाइन माध्यमातून चालू ठेवणे काळाची गरज बनत होते. ऑनलाइन क्लास चे नियोजन अवलंब करणे यामध्ये शिक्षक कुठे कमी पडले नाहीत. लॉकडाऊन मुळे घरात बसून राहिलेले विद्यार्थी वर्चुअल क्लास रूमच्या माध्यमातून अध्ययन करू लागले. अध्ययना नंतरच्या उर्वरित वेळेमध्ये विद्यार्थ्यांना समायोजन साधने, घरातच बसून राहणे, शालेय वातावरणापासून दूर राहणे यांसारखे बाबींमुळे त्यांच्या भावनिक, शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याचे पालकांच्या शिक्षकांच्या निदर्शनास आल्याने या संशोधन कार्याची निवड करण्यात आली आहे. कारण लोकडॉन च्या दरम्यान मोबाईल फोन वेळ घालवणे, निष्क्रिय बसणे आणि झोपण्यात घालवलेल्या तासांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली तर शारीरिक हालचालींवर घालवलेल्या तासांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. याचा त्यांच्या मानसिक आरोग्या वरही परिणाम झाला आहे.
Files
30. प्रा.साबळे दत्तात्रय मनोहर , प्रा.थोरात दिपाली एकनाथ-May-June 2022.pdf
Files
(810.1 kB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:5da639d611c71f341f29c4a2bab1383f
|
810.1 kB | Preview Download |