Published September 16, 2023 | Version v1
Journal article Open

हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठी वृत्तपत्रांची भूमिका

  • 1. संशोधन विद्यार्थी, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा जिल्हा: लातूर ४१३५२१ महाराष्ट्र, भारत

Description

हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठी वृत्तपत्रांची भूमिका

महाजन अनुराधा बस्वराज

संशोधन विद्यार्थी, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा जिल्हा: लातूर ४१३५२१ महाराष्ट्र, भारत

Corresponding author E-mail: mahajananuradha424@gmail.com

Received: 14 September, 2023 | Accepted: 15 September, 2023 | Published: 16 September, 2023

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महत्वाचे शब्द: निजाम सरकार, मुक्ती लढा, जनजागृती /लोकजागृती, स्वातंत्र्य सैनिक, निजामविजय, नागरिक-राजहंस-उदय, मराठवाडा, केसरी, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, लोकमान्य, महाराष्ट्र व तरुण भारत, सोलापूर समाचार, नवशक्ती, पुढारी

प्रस्तावना

प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. राज्यकर्त्यावर अंकुश ठेवणारे साधन प्रसार माध्यमे आज आपणास सभोवताली घडणाऱ्या घटनांची अवगत करतातच पण प्रसंगी राज्यकर्त्यांनाही धारेवर धरतात. स्वातंत्र्यापूर्वी आधुनिकीकरणातील या अहिंसक शस्त्राचे सामर्थ्य स्वातंत्र्यलढ्यातील सर्वच नेत्यांनी ओळखले होते. म्हणूनच "द बेंगॉल गॅझेट" या पहिल्या इंग्रजी वृत्तपत्राच्या आरंभानंतर मराठी प्रबोधनाच्या पहिल्या चळवळीपासून सामाजिक धार्मिक चळवळीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आंदोलने क्रांतिकारकांच्या चळवळीत यांच्या प्रचार प्रसारासाठी प्रसारमाध्यमांचा वापर करण्यात आला. मोघलांच्या दक्षिणेतील सुभेदार मीर कमरुद्दिन निजाम उलमूल्क याने ३१ जुलै १७२४ ला भागानगर येथे हैदराबाद संस्थानाची निर्मिती केली. त्याचे घराणे आसफिया घराणे म्हणून ओळखले जाते. इसवी सन १७२४ ते १७४८ पर्यंत जवळजवळ सव्वा २००वर्ष या घराण्यांनी राज्य केले.

वर्तमानपत्रांचा इतिहास पाहता पहिली उर्दू पत्रिका १८५७ मध्ये रीसाला-ए-तबाबत होती. तर १८६० मध्ये खुर्शीद-ए-डेक्कन आणि निजाम गॅझेट ही महत्वपूर्ण वर्तमानपत्रे तर खुर्शीद-डेक्कन, सुभा-ए-डेक्कन, हजारे दास्तान, अफसरून अकबर, अकबर ए असफी, मुर्शीर-ए-डेक्कन इत्यादी अग्रणी उर्दू पत्रिका होत्या. हैदराबाद मधून प्रकाशित होणारे पहिले वर्तमानपत्र गोलकोंडा होते याशिवाय इतरही मराठी वृत्तपत्रे होती.

१९२० पूर्वीची मराठी वर्तमानपत्रे

  1. निजाम विजय - राघवेंद्र शर्मा दिगंबरराव बिंदू ल. ब. फाटक
  2. नागरीक - राजहंस - उदय वासुदेवराव औरंगाबादकर
  3. मराठवाडा - आ. क्र. वाघमारे
  4. केसरी - लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर
  5. ज्ञानप्रकाश - कृष्णाजी त्र्यंबक रानडे
  6. ज्ञानोदय - अहमदनगरच्या अमेरिकन मराठी मिशन सदस्य
  7. लोकमान्य - शिवराम परांजपे, गंगाधरराव देशपांडे
  8. महाराष्ट्र व तरुण भारत - गजानन त्र्यंबक माडखोलकर
  9. सोलापूर समाचार - नरसप्पा अबन्ना
  10. नवशक्ती सदानंद
  11. पुढारी गणपतराव जाधव, इत्यादी

प्रामुख्याने सामान्य जनतेला जागृत करण्याचे कार्य निजामाविरुद्ध प्रकरण लढा देण्याचे कार्य वर्तमानपत्रे व प्रसार माध्यमाने केले यात विविध भाषिक मराठी हिंदी कन्नड उर्दू इंग्रजी इत्यादी वर्तमानपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे.

नेपोलियन ने म्हटले होते, "चार विरोधी वर्तमानपत्रांची भीती एक संस्थानातील पत्रे - पत्रिकांनी, वृत्तपत्रांनी निजामाची झोप उडवली"

उद्दिष्टे

  1. हैदराबाद संस्थानातील प्रसारमाध्यमांची पार्श्वभूमी अभ्यासणे.
  2. हैदराबाद संस्थानातील लोकजागृती मध्ये वर्तमानपत्रांचे योगदान यांचा आढावा घेणे.
  3. हैदराबाद मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य सेनानी सामान्य जनता यांनी मुक्ती लढा ते दिलेल्या बलिदानावरती प्रकाश टाकणे.
  4. हैदराबाद संस्थानातील विविध भाषिक वर्तमानपत्रे कन्नड उर्दू तेलगू मराठी इंग्रजी इत्यादींची भूमिका स्पष्ट करणे.
  5. हैदराबाद संस्थानातील वृत्तपत्रांचा संस्थानावरील सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय घटकावरती पडलेला प्रभाव अभ्यासणे.

विषय विवेचन

निजामाच्या संस्थानात मराठवाडा तेलंगणा कर्नाटक अशा बहुभाषिक प्रांतांचा समावेश होता. इसवी सन १९१९ ला मीर उस्मान अलीने संस्थानातील जनतेच्या प्राथमिक मूलभूत अधिकारावर जालीम बंधने टाकण्यास प्रारंभ केला. गष्ती निशाण ४२-४३ काढून सभा संमेलने बैठका प्रवचने व मिरवणूकांवर बंधने लादली. शाळा, वाचनालये, व्यायामशाळा, आखाडे इत्यादी मंत्रिमंडळाच्या परवानगीशिवाय काढू नये अशी सक्ती केली. निजामाच्या या अन्यायी वागणूकी विरुद्ध लढा देण्याचे कार्य आर्य समाज, वंदे मातरम चळवळ, स्वातंत्र्यसैनिक, वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे यांचा मोलाचा वाटा आहे.

निजाम विजय

राघवेंद्र शर्मा दिगंबरा बिंदू ल.ब. फाटक यांनी एकत्र येऊन निजामाच्या परवानगीने या वर्तमानपत्राची सुरुवात केली. ३८ लाख मराठी भाषिकांचे संस्थानातील मराठी भाषेतील निजाम विजय एकमेव वर्तमानपत्र होते संस्थानातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य निजाम विजयने केले सामान्य जनतेच्या प्रश्नांना ब्रिटिश वर्तमानपत्रात जागा नसत म्हणून प्रांतीय वर्तमानपत्रांची आवश्यकता होती महाराष्ट्र परिषदेची आवश्यकता निजाम विजय करांना सार्वजनिक कार्यकर्त्यांना वाटली म्हणून त्यांनी पत्रातून मांडली इसवी सन १९४८च्या संस्थानाच्या विलीनीकरणानंतर निजाम विजयने लोकविजय असे नाव धारण केले तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा प्रयत्नही केला.

नागरीक - राजहंस - उदय

नागरिक नावाचे वर्तमानपत्र १० एप्रिल १९२९ मध्ये प्रारंभ झाले संपादक दिगंबरराव बिंदू दे.ल. महाजन दिगंबरा बिंदू श्रीराम जोशी हे हैदराबाद स्टेट पुराभिलेखन कार कार्यालयाचे माजी संचालक होते त्यांनी राजहंस नावाची मासिक काढले मराठी भाषिक प्रदेशात बोध निजाम विजय नागरिक राजहंसह उदय अरुणोदय मंदार पुष्पमाला या पत्रांची सुरुवात केली १९२० नंतर यातील निजाम विजय व्यतिरिक्त सर्व अल्पजीवी आणि अल्प प्रभावी होते या पत्राशिवाय हिप्परगाच्या राष्ट्रीय शाळेत स्वामी रामानंद तीर्थांच्या मार्गदर्शनाखाली सेवक नावाचे हस्तलिखित चालवले जात असे.

अर्धसाप्ताहिक मराठवाडा

मराठवाड्यातील झुंजार पत्रकार राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ता म्हणून आ. कृ. वाघमारे यांचा उल्लेख होतो. मराठवाडा दैनिकाचे संपादक अ. कृ. वाघमारे होते. संस्थानातील तरुणांच्या मनाच्या वेदनांना वाचा फोडण्याचे वर्तमानपत्र मराठवाडा होते. सामाजिक असंतोषावर धारदार लेखणीद्वारे मराठवाड्यातून लिखाण वाघमारेंनी केले. त्यांचे लिखाण तरुणांना आणि संस्थानातील मराठी भाषिकांना आकर्षित करे निर्भयपणे संस्थानातील माहिती देणारे वर्तमानपत्र मराठवाडा होते मराठवाडा वर्तमानपत्राने आपला विचार प्रवाह बदलला नाही. १९३८-३९ च्या सत्याग्रहात मराठवाडा चळवळीचे मुखपत्र होते. चळवळीचे नेतृत्व महाराष्ट्र परिषदेच्या व्यासपीठावरून पुढे आले उदाहरणात गोविंदराव नानन दिगंबरा बिंदू स्वामी रामानंद तीर्थ आ. कृ. वाघमारे इत्यादि संपादक आ.क्र.म. वाघमारे 'मोराची पिसे लावलेला डोंमकावळा', 'संग्राम सुरू झाला', 'कारागृहाचे दरवाजा आता उघडा', 'सत्याग्रहाचा वाढता जोर' आणि 'कायदेभंगाला आव्हान' इत्यादी संपादकीय लेखाने निजामाची झोप उडवण्याचे काम केले.

साप्ताहिक वैदिक आदर्श

"या साप्ताहिकाचे प्रकाशन ७ डिसेंबर १९३४ ला सुरू झाले. संपादक श्री चंदुलाल आणि पंडित नरेंद्रजी यांचे सहकारी श्री सोहनलाल ठाकूर उमराव सिंह हे होते. त्यांनी निजामाचा रोष आपल्यावर ओढवून घेऊन सुद्धा हे साप्ताहिक उत्तम प्रकारे चालविले या पत्रावर निजामशासनाची करडी नजर राहत असे त्याची क्रोधपूर्ण दृष्टी टाळूनच वैदिक आर्य वैदिक आदर्श काढावे लागत असे दुसऱ्या बाजूस उर्दू पत्रामधील आर्य समाज स्टेट काँग्रेस आणि हिंदूच अपमानित करणाऱ्या वक्तव्याकडे राज्य शासन डोळेझाक करत असे.

हैदराबाद मधील राजकीय सामाजिक आंदोलनाची सुरुवात वास्तविक उर्दू पत्र पत्रिकांच्या धार्मिक आक्रमकतेमुळे झाली ज्याचे उत्तर आर्यपत्र पत्रिकांनी शाखा प्रतीक्षा यांनी तिने दिले म्हणूनच असे म्हणणे तू सहज पूर्ण होईल की आर्य समाजाने सुद्धा उर्दू पत्रिका प्रमाणेच धार्मिक वेडगळपणाच्या आगे तू ओतण्याचे काम केले वास्तविकता अशी आहे की इस्लामच्या सिद्धांतात दुराग्रहपूर्वक प्रसारित करण्याच्या कार्यात कार्यपत्र पत्रिकांनी खीळ घातली.

निष्कर्ष

भारत स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिना दोन दिवसांनी हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट झाले हैदराबाद संस्थानातील मराठी वृत्तपत्रांनी लढ्यासाठी जनजागृती करण्याचे कार्य केले. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेपासून जबाबदार शासन स्थापनेचा उद्देश मराठी वर्तमानपत्रांनी प्रस्तुत केला. संस्थानातील मराठी वर्तमानपत्र अल्पकाळच अस्तित्वात राहिले. निजाम विजय संस्थानात हैदराबाद मधून निघणारे मराठी वर्तमानपत्र मात्र यास अपवाद होते. निजाम विजयने नावाप्रमाणे कार्य केले नाही उलटपरत्वे लोकजागृती घडविली ल.ब. फाटकांनी निजाम विजय मधून केलेले कार्य हैदराबाद मुक्तिसंग्रामात लेखक, विचारवंत, समाजसुधारक, विद्यार्थी नेतृत्व, आणि जनजागृतीसाठी घडविण्याचे कार्य अत्यंत उपयोगी होते.

थोडक्यात प्रसारमाध्यमांच्या विविध अंगापैकी एक प्रभावी व महत्त्वपूर्ण घटक म्हणून वृत्तपत्रांना ओळखले जाते.

संदर्भसूची

  1. अनंत भालेराव, "हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा" मौज प्रकाशन, गृह मुंबई, चौथी आवृत्ती, २०२३
  2. प्रा. डॉ. चंद्रशेखर लोखंडे, "मराठवाड्याचे मुक्ती लढा आणि हैदराबाद संस्थान" विद्याभारती प्रकाशन, लातूर २०२२, पृष्ठ क्र. ११२
  3. डॉ. जनार्धन वाघमारे "हैदराबाद स्वातंत्र्यलढ्याचे अंतरंग" निर्मल प्रकाशन, कृष्णाई नरहर कुरुंदकर मार्ग, कैलास नगर, नांदेड
  4. प्रशांत सुधाकरराव देशमुख, "हैदराबाद मुक्तिसंग्रामात मराठी वृत्तपत्रांची भूमिका" भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, पश्चिम क्षत्रिय कार्यालय, डेक्कन कॉलेज पुणे, २०२२
  5. जोशी प्रा. द. स. पा., काळाच्या पडद्याआड, ०३ म. सा. ज. हैदराबाद २७, प्रथम आवृत्ती, १९९२
  6. हैदराबाद स्वराज्य, दिनांक १३ ऑक्टोबर १९३८

 

Files

20230104110113025_c.pdf

Files (198.6 kB)

Name Size Download all
md5:301ae725824f0945c2f6554a354a33e8
198.6 kB Preview Download