डॉ. एन. डी. पाटील यांचे आर्थिक विचार
Authors/Creators
- 1. (अर्थशास्त्र विभाग) कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव, ता. खटाव जि. सातारा
Description
महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना चालना देण्याचे महत्वपूर्ण काम डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्यकर्तुत्व केले. डॉ. एन. डी. पाटील यांचे कार्यच अशा प्रकार होते की भल्या भल्याच्या विचारांत बदल होत गेला आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारचे प्रेरक म्हणून ते प्रसिद्ध झाले. १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गावाची पाटीलकी असलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. चौथीपर्यंतचे शिक्षण ढवळी येथे झाल्यानंतर त्यांना बागणीच्या शाळेत घातले. या शाळेत त्यांना पुरोगामी, बंडखोर विचाराचे काळू सावळा माळी नावाचे शिक्षक भेटले. त्यांच्या विचाराचा मोठा प्रभाव एन. डी. वर पडला. परीट नावाच्या मास्तरांच्या हट्टामूळे डॉ. एन. डी. पाटील यांना पुढील शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आष्टा येथे काढलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये घेता आले. या शाळेतही त्यांना सत्यशोधक विचाराची शिदोरी मिळत गेली. येथूनच त्यांच्यात पुरोगामित्व, बंडखोरपणा आणि निर्भीडपणा वाढत गेला. सत्याला सत्य मानण्याची, जे सत्याच्या विरुद्ध जातात त्याला ना भीता परखडपणे निक्षून सांगण्याची हिम्मत त्यांच्यात वाढत गेली. यांची झलक याच काळात दिसू लागली. त्याकाळात त्यांच्या गावात आंबाबाईच्या देवळात कीर्तन करणाऱ्या बुवांनाच ते विचारायचे “देव आहे का? हा दगडाचा देव वर फेकला तर ऐकणाऱ्यांच्या डोक्यात पडेल की नाही? मग देव त्याला वाचवेल का?”
डॉ. एन. डी. पाटील यांनी पुणे विद्यापीठातून सन १९५५ साली एम.ए. (अर्थशास्त्र) आणि १९६२ साली एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्रा. एन. डी. पाटील यांनी 1954 ते 1957 या कालावधीत सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहिले. याबरोबरच त्यांनी या काळात ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणूनही काम पाहिले. 1960 साली सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये प्राचार्यपदी रूजू झाले. त्यांना तीन विद्यापीठाच्या डी. लिट पदव्या मिळाल्या आहेत.
आपले संपूर्ण आयुष्य समाज व देशसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्या संघर्षाचा मध्यबिंदू हा नेहमीच समाजातील तळागळातील दिन दुबळा, दुर्लक्षित आणि वंचित समाजघटकांचा समावेश असत. त्यांनी केलेल्या लेखनातून, त्यांच्या भाषणातून त्यांच्या आर्थिक विचारांची कल्पना येते. त्यातील काही महत्वाच्या पण थोडक्यात आर्थिक विचारांची माहिती खालील मुद्याच्या मदतीने सांगता येईल.
Files
19..pdf
Files
(411.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:e8dbb81596c0467a6cce78c694807e41
|
411.4 kB | Preview Download |