अनुसूचित जमातींच्या समस्यांचा ऐतिहासिक मागोवा
Authors/Creators
- 1. 2शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे, तालुका- मुरबाड, जिल्हा ठाणे.
Description
सामाजिक संशोधक व ऐतिहासिक सिद्धांतानुसार अनुसूचित जमाती या जंगलाचे राजे होते असी प्रतिमा दिसते मात्र हे जंगल आपलीच संपत्ती आहे व त्याबद्दल कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. अशी अनुसूचित जमातींची धारणा होती. मात्र ब्रिटिश काळात ब्रिटिशांनी आपल्या स्वार्थासाठी सगळी जंगले ताब्यात घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंट अस्तित्वात आणले आणि या जमातींचे हक्क संपुष्टात आणले. आणि भारतातील अनुसूचित जमातींच्या समस्या दिवसेंदिवस वाढत गेल्या स्वतंत्र भारत सरकारने फॉरेस्ट डिपार्टमेंट ही ब्रिटिशांची देणगी जशीची तशी ठेवू त्यामधील बंधने दिवसेंदिवस वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचरोबरीने भारतातील अनुसूचित जमातींच्या समस्यांचा बंध सोडविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारी प्रशासन यंत्रणा कुचकामी ठरत आहे किंबहुना या समस्या सुटु नयेत असे समाजातील बहुसंख्य उच्चभ्रू वर्गाला वाटत आहे. कारण या समस्या सुटल्या तर त्यांच्या रोजगार नष्ट होईल, भ्रष्टचाराचा मार्ग बंद होईल, अशी भीती त्यांना वाटते आहे त्यामुळे स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतरही सुरुवातीला ज्या समस्याचा पाढा वाचला जात होता. त्याच्यामध्ये बदल झालेला दिसत नाही मात्र या बदलाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा निधी लाटला जातो आहे. या जमातींच्या समस्यांचा ऐतिहासिक आढावा व त्या सोडवणुकीचे प्रयत्न कसे केले जावेत या विषयांचा उहापोह प्रस्तुत शोधनिबंधात करण्याचा प्रयत्न केला आहे.
Files
26.pdf
Files
(326.1 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:48814452513279974b226657cbd0c31f
|
326.1 kB | Preview Download |