मुंबई शहरातील नाट्यक्षेत्रातील नाट्याकलावंतांचे सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे अध्ययन
Authors/Creators
- 1. सहाय्यक प्राध्यापक – अर्थशास्त्र विभाग, भिमराव प्रधान कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शहापूर. जि.ठाणे
Description
नाट्यक्षेत्राचा आवाका विस्तृत असला तरी देखील नाट्यकलाकार हा सध्या फारचं दुर्लक्षित घटकांत गणला जातो. त्यांना प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी तर असतेच पण त्याच जोडीला हे कलाकार नानाविध आर्थिक तथा सामाजिक समस्यांना वारंवार तोंड देत असतात. त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध नाट्यसंमेलन आयोजित करणे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी कार्यशाळा राबविणे, कौटुंबिक तसेच शैक्षणिक योजनांचा लाभ मिळवून देणे व अशा त्तसम मार्गाने नाट्यकाराचा दर्जा टिकून राहील. हा हेतू समोर ठेवून मी या संशोधनपर विषयाचे अध्ययन करीत आहे. केवळ प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या प्रतिसादातूनच कलाकार विकसित होत असतो. परंतु हेच हास्य देताना या हास्यामागे दडलेल्या अनेक रंगछटा सर्वच कलाकार मंडळी सहन करीत असतात. प्रेक्षकांना मनोरंजित करण्यासाठी प्रसंगी ते स्वतःचे कौटुंबिक उणेदावे बाजूला ठेवतात. वैयक्तिक आयुष्यात कितीही दुःख असले तरी एकदा का पाय रंगमंचावर पडले की कलाकाराला आपल्या भौतिक दुनियेचे भान रहात नाही. अशा नाट्यकर्मींच्या समस्या जाणून घेऊन काही सकारात्मक मार्ग काढता येईल का? असा विचार एक कलाकार म्हणून माझ्या आकलनात आला आणि तिथूनच या विषयावर संशोधन करण्यास सुरुवात झाली. प्रस्तुत संशोधन पेपरात मी ‘मुंबई विभागातील नाट्यक्षेत्रातील नाट्यकलावंतांचे सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे अध्ययन’ केले आहे. हे संशोधन पुर्णत्वास येण्यासाठी मी वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, संबंधित पुस्तके आणि विविध संकेतस्थळे इत्यादी दुय्यम स्वरुपाच्या महितीचा वापर केला आहे
Files
14.pdf
Files
(726.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:f7cf706b5aceb1a380f1a4b39790ed16
|
726.6 kB | Preview Download |