जागतिकीकरणाचा भारतीय कृषीवर झालेला परिणाम
Authors/Creators
- 1. भूगोल विभाग प्रमुख, श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा, जि.सोलापूर
Description
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण असे महत्व आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणुन शेती क्षेत्राची ओळख आहे. आज ही एकुण लोकसंख्येच्या जवळपास ६०% लोकसंख्या ही कृषी व कृषी संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न, आंतरराष्ट्रीय व्यापार, रोजगार, औद्योगिक आणि इतर क्षेत्राचा विकास तसेच उपभोगाचे मुख्य साधन इत्यादी बाबतीत कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा १९५० -५१ मध्ये ५६.४६% इतका होता. यावरुन भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीं क्षेत्राचे असणारे महत्व लक्षात येते. परंतू कालांतराने भारताने उद्योग आणि सेवा या दोन क्षेत्रात केलेल्या वृध्दीने हा हिस्सा कमी कमी होत गेला.
२०११-१२ मध्ये अनुक्रमे राष्ट्रीय उत्पादनात कृषी, औद्योगिक व सेवा क्षेत्राचा वाटा अनुक्रमे १८.९%, ३२.९% आणि ४८.२% इतका आहे. तर सन २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय उत्पादनात कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र यांचा वाटा अनुक्रमे १७.६%, २९.७% आणि ५२.७% इतका आहे. यावरुन असे दिसून येते की, अलीकडच्या काळात शेती क्षेत्राचा वाटा घटत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विशेषतः हरित क्रांतीच्या उदयाने भारतातील अन्नाच्या उत्पादनात व उत्पादकतेत वाढ झाली. खरेतर हा भारतीय शेतीला सुवर्ण काळ होता. याच दरम्यानच्या काळामध्ये उत्पादनामध्ये विविधता निर्माण झाली होती. भारतीय शेतीचा हा प्रवास चालु असतांना सन १९९१ मध्ये प्रक्रिया जगामध्ये सुरु झाली आणि आपणही स्वत:हुन हे नविन आर्थिक धोरण स्विकारले.
Files
34..pdf
Files
(347.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:7a772e26d1e49ec14dda5d5c68a75b6f
|
347.5 kB | Preview Download |