प्रवासवर्णन: साहित्यप्रकार
Description
प्रवास आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो. आपण प्रत्येक जण कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रवास करीत असतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रवास करीत असते. मातेचे उदर ते स्वतःचे घर हाही एक प्रवासच असतो. प्रवास म्हणजे तरी काय ? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. प्रवास हा वेगवेगळ्या प्रकारे करता येतो.प्रवास हा निसर्गाची विविध रूपे दाखवीतो. विविध स्वरूपाची वृक्षवल्ली, डोंगर -दऱ्या,वनराई,शेती, शेतीच्या अवतीभोवतीचे निसर्ग मातीची पायवाट,कौलारू घरे,नदी-नाले,मंदिर,पर्वत- शिखरे इत्यादी आणि कित्येक घटक आहेत की त्या सर्व घटकांतून मानवी मनाला सुख समाधान आणि सर्वोच्च आनंद प्राप्ती होत असतो. यावरून आपणास असे म्हणता येईल की, प्रवास हा मानवी जीवनातील अविभाज्य असा भाग आहे. प्रवास वर्णन हा एक मराठी साहित्यातील ललित वांङमयप्रकार आहे. हा विषय अतिशय व्यापक आहे. प्रवास वर्णन हा वांङमयीनप्रौढता कशा स्वरूपाची आहे. त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्याचप्रमाणे त्याचे मानवी जीवनातील महत्त्व समजून घेण्याच्या जिज्ञासापोटी हा विषय संशोधनासाठी निवडलेला आहे.
मानवी समाजात प्रवास करणे हा एक अवघड प्रकार पूर्वी समजला जात होता पण आता प्रवास मार्ग विविध साधनांमुळे अतिशय सुलभ झाला आहे. आज काल प्रवास ही विशेष आवडीची सहज सुलभ तसेच सहज साधी अशी बाब झाली आहे. समाजातील विविध व्यक्ती त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला प्रवास वर्तमानपत्रातून कथा,कादंबरी, ललित लेखनातून चित्रीत केला आहे ते वाचून इतर व्यक्ती प्रवास करतात. विशिष्ट ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहार-विहार,निसर्ग,व्यवसाय, वस्ती तेथील संस्कृती इत्यादी बाबींची ओळख प्रवासातून होते. प्रस्तुत शोधनिबंधात प्रवास वर्णनाचे स्वरूप,वैशिष्ट्ये व प्रकार तसेच प्रवासवर्णन हा मराठीवाङ्मयाशी कसा जोडला गेला आहे, त्याचा शोध येथे घेतलाआहे.
Files
31..pdf
Files
(507.8 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:b12d3c57698ff7bd40ec7ee026aa6933
|
507.8 kB | Preview Download |