अपारंपारिक ऊर्जा साधनांचा विकासाचे ग्रामीण विकासातील महत्त्व "महाराष्ट्र सौर कृषी पंप योजनेच्या वापराचा अभ्यास " : संदर्भ - तालूका - डहाणू , जिल्हा – पालघर.
Authors/Creators
- 1. ग्रामीण विकास, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय , वसई, महाराष्ट्र.
- 2. पर्यावरण शास्त्र, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई महाराष्ट्र.
- 3. शोध प्रबंध विद्यार्थीनी, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई महाराष्ट्र
Description
मानवाने , विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे ऊर्जा मिळविणे शक्य झाले आहे. ऊर्जा वापराच्या क्षमतेनुसार राष्ट्राच्या प्रगतीची अवस्था ठरते.औद्योगिकीकरणामुळे ऊर्जेचा अधिकाधिक वापर होत आहे. भूपृष्ठात या ऊर्जेचे साठे उपलब्ध असले, तरी ते मर्यादित स्वरूपात आहेत. त्यांची निर्मिती होण्यास दीर्घकाळ लागतो. जीवाश्म इंधने संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. मानवी आयुष्याच्या कालावधीत या ऊर्जा संसाधनांची निर्मिती होऊ शकत नाही.अशा अपारंपरिक ऊर्जा संसाधनांवर उपाय म्हणून अपारंपारिक ऊर्जा संसाधनांची निर्मिती झाली .अपारंपारिक ऊर्जा निर्मिती लाभ्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण , मुलाखतीव्दारे केल्यानंतर तिथल्या आदिवासी विभागातील , अल्प भूधारक शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर असे निरीक्षण नोंदविले गेले की , अपारंपारिक ऊर्जा निर्मितीची मेगावॅट क्षमता वाढली शिवाय भविष्यकालीन दृष्टिकोनातून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२० खूपच फायद्याचे आहे .तसेच शेतकऱ्यांमध्ये एक आत्मविश्वास आला . परंतु ह्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे ? , ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरावा ?, किती एकरसाठी कोणता एच पी चा पंप मिळेल ? ( ३ एच पी , ५ एच पी , ७.५ एच पी ) तसेच या पंपसाठी किती भांडवल लागेल व भरावे लागतील ? , शासन किती अनुदान देईल व कोणत्या पद्धतीने आपल्याला मदत करतील ? ह्यांचा सर्वांगीण विचार होणे आवश्यक आहे .ह्या संशोधनातून इतकेच सिद्ध करण्याचे प्रयोजन आहे की , पारंपारिक पद्धतीने करत असलेली शेती व अपारंपारिक पद्धतीने करत असलेली शेती यामध्ये फायदेशीर पद्धत कोणती याबद्दल शेतकऱ्यांमध्ये स्व - जागृती निर्माण करणे गरजेचे ठरणार आहे . तसेच ह्या संशोधनाव्दारे शासनालाही योग्य उपाययोजना साकारण्यासाठी सहाय्य होऊ शकते
Files
43..pdf
Files
(467.0 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:310ac9bdff17746d47a300b81edad530
|
467.0 kB | Preview Download |