लोक चळवळीद्वारे जल व्यवस्थापन
Authors/Creators
- 1. कला व विज्ञान वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर ,गढी. तालुका गेवराई जिल्हा बीड 43 11 22
Description
भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला देश आहे. भारतामध्ये या नैसर्गिक साधन संपत्तीच्या जोरावर कृषी संस्कृतीचा विकास झालेला आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या 65 ते 70 % लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थे कृषी क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक काळामध्ये कृषी क्षेत्राचा विकास शाश्वत पद्धतीने करावयाचा असल्यास उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन प्रत्येक क्षेत्रामध्ये करणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य बनले आहे. कारण आजचे पाणी हे उद्याचे जीवन आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार “पाणी वाचवणे म्हणजे पाण्याची निर्मिती करणे होय” त्यामुळे सामूहिक चळवळीद्वारे सिंचन क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, घरगुती वापर इत्यादी व इतर कारणासाठी लागणाऱ्या पाण्याचे काटकसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. कारण आपल्या सूर्यमालेत पृथ्वी एक असा ग्रह आहे की ज्या ग्रहावर पाण्याची उपलब्धता आहे. या उपलब्ध पाण्यापैकी 98 % पाणी क्षारयुक्त आहे व उर्वरित 2 % पाणी हे गोड पाणी आहे. म्हणजेच उपलब्ध पाणी साठ्यापैकी मानवाच्या वापरासाठी 0.3% पाणी उपलब्ध आहे पाण्याचा वापर व त्याची गरज याचा आपण विचार करायला हवा तसेच शेती वनस्पती प्राणी यांना देखील पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे जलाची उपलब्धता व उपभोगीता यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून ते योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व्यवस्था करून वेगवेगळ्या उपाययोजनाद्वारे जल संरक्षण संवर्धन व विकास यांची शास्त्रीय दृष्ट्या केलेली चिकित्सात्मक रचना म्हणजे जल व्यवस्थापन होय यामध्ये जलाची उपलब्धता गरजांचा अंदाज जलवाटपाचा प्रकार जल व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणीचा आढावा त्यावर करावयाची उपायोजना या सर्व गोष्टींचा समावेश होतो आज आपण ज्या पद्धतीने वागत आहोत त्याच पद्धतीने वागत राहिलो तर भविष्यकाळात फार मोठ्या संकटांना समोरे जावे लागेल हा दृष्टिकोन समोर ठेवून जल व्यवस्थापन ही कोण्या एकट्या दुखण्याची जबाबदारी नाही तर समाजातील प्रत्येक घटकांनी ती आपली जबाबदारी म्हणून या क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे म्हणजेच जल व्यवस्थापन ही लोक चळवळ करून त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
Files
100369.pdf
Files
(414.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:501b394a575accf0c8a77af929fcaccf
|
414.2 kB | Preview Download |