मौखिक इतिहासलेखन पद्धती सातारचे श्री छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय : एक अभ्यास
Authors/Creators
- 1. इतिहास विभाग प्रमुख, श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड ता. माण, जि. सातारा.
Description
प्रस्तावना:-
इतिहास अभ्यास व संशोधनासाठी वस्तुसंग्रहालयाचे महत्वाची भूमिका पार पाडत असतात. एखाद्या कालखंडाचा राजघराण्याचा अभ्यास करीत असतांना ज्या ठिकाणी लिखित माहिती कमी प्रमाणात उपलब्ध असते वा माहिती मिळत नाही अशावेळी वस्तुसंग्रहालये उपयोगी पडतात वस्तुसंग्रहालयातील विविध वस्तूच्या अभ्यासाने आपल्याला त्या काळातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती, कला व स्थापत्य, शस्त्रात्रे,पोषाख, दागदागिने, कलात्मक वस्तु, हत्यारे, नाणी इ. माहिती मिळते व त्याचा अभ्यासासाठी उपयोग होतो. इतिहासाची एक शाखा म्हणून वस्तुसंग्रहालयाकडे पाहिले जाते. आधुनिक काळात देखील संग्रहालयाच्या अभ्यासाचे महत्व कमी झालेले नाही. तर ते दिवसेंदिवस वाढतच आहे तसेच वस्तुसंग्रहालयांचा विकास झालेने त्याचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्व वाढत चाललेले आहे. ‘’मानवी जीवनाच्या भूत -वर्तमान व भविष्यकाळातील सर्व व्यवहारासंबंधी वस्तूंचे हेतुनिष्ठ शास्त्रीय संग्रहण करून त्यांचे तत्व या उद्देशानुसार जनतेच्या सर्वच विशिष्ट वर्गासाठी पद्धतशीर वर्गीकरण, प्रदर्शन व संरक्षण करून मनोरंजन व ज्ञान या साधनांनी मानवी प्रगतीच्या कडा रुंदावण्यास मदत करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय”. प्रस्तुत शोधनिबंधात श्री छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय सातारा यावर अल्पसा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Files
5..pdf
Files
(436.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:8bc3186bf9fca73e868d95f397794718
|
436.6 kB | Preview Download |