वाढत्या शहरीकरणाचे घटक आणि समस्या
Description
प्रस्तावना -
21 व्या शतकात शहरीकरण किंवा नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. आणि पुढील काही दशकात विकसनशील देशांमध्ये विशेषत: आशिया, आफ्रिका खंडात शहरीकरणाचा वेग अभूतपूर्ण असणार आहे असे भाकित आहे. महाराष्ट्रातील शहरीकरणाचा विचार करता महाराष्ट्र हे भारतातील 4 थ्या क्रमांकाचे शहरीकरण झालेले राज्य आहे. 1961 ते 2001 या कालावधीत महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्या दुप्पट झाली आहे. शहरीकरण वाढत असताना आर्थिक कारणांसाठी होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाणही वाढणारच आपल्या देशात विकास आणि स्थलांतराचे प्रश्न एकमेकांशी संबंधित असल्याचे अनेकदा दिसले आहे. छोट्या-मोठ्या शहराचा उदय आणि विस्तार होता- होता त्याचे रूपांतर महानगर मध्ये होणे हा औद्योगिक वाढीचा अपरिहार्य परिणाम आहे. आधुनिक शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे. शहरात उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधीमुळे खेड्याकडून शहराकडे येणाऱ्या लोकांचा ओघ सतत सुरू राहतो. शहर किंवा नगर ही संकल्पना भारतासाठी नवीन नाही अगदी प्राचीन कालखंडापासून भारतात नागरि संस्कृतीची सुरुवात झाली आहे. सर्वात प्राचीन समजल्य जाणाऱ्या सिंधू संस्कृतीतील मोहंजोदडो व हडप्पा हे नगराची उत्तम उदाहरणे आहेत. शहरातील विविध सुख सोयीकडे ग्रामीण जनतेने आकर्षित होणे साहजिक आहे. इस 1950 मध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 30% लोकसंख्या शहरात राहणारी होती. वर्तमान स्थितीत जगणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 50% लोकसंख्या ही शहरवासी बनली आहे. शहर या वस्तीची व्याख्या करणे तेवढे सोपे नाही. भारतीय परंपरेत मोठ्या वस्ती समूहांना पूर-पुरा, नगर ( संस्कृतोद्भव) व शहर (अरेबिक) ही संबोधने वापरण्यात आल्यामुळे त्या वस्तीचा नागरी दर्जा कळू शकतो. भारतीय जनगणना जेव्हा (1875) रूढ झाली. तेव्हापासून 1961 पर्यंत ज्या गावाची लोकसंख्या 5000 किंवा जास्त असेल त्यांना शहर संबोधावे असे ठरले गेले यावरून वस्ती समूहाचा लोकसंख्येची निकट संबंध आहे हे सिद्ध होते. हा निकष सर्व राष्ट्रांमध्ये रूढ नसून याबाबतित राष्ट्रांमध्ये महत्त्वाचे पूरक आढळून येतात.
Files
4.pdf
Files
(338.3 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:0d9ad506d3bd94dd24af40bd55b95350
|
338.3 kB | Preview Download |